Nusrat Jahan Baby Bump: नुसरत जहाँचा पहिला 'बेबी बंप'वाला फोटो व्हायरल; नवऱ्याने सांगितले,'ते माझे नाही'

Published: June 11, 2021 08:34 PM2021-06-11T20:34:23+5:302021-06-11T20:40:23+5:30

Nusrat Jahan Baby Bump first photo: प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि लोकसभा खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) सध्या वेगळ्याच विषयात चर्चेत आली आहे. पती निखिलने आपण तिच्यापासून खूप काळापासून दूर असल्याचे सांगितल्याने हे मुल कोणाचे यावर आता चर्चा होऊ लागली आहे.

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि लोकसभा खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) सध्या वेगळ्याच विषयात चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती प्रेग्नंट (Nusrat Jahan pregnant) असल्याची चर्चा होती. मात्र, तिच्याकडून याचा खुलासा आला नव्हता. आता नुसरत जहाँचा पहिला फोटो समोर आला आहे. (Nusrat Jahan Baby Bump First Photo)

यामध्ये नुसरत जहाँचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. (Nusrat Jahan Baby Bump First Photo) यामुळे नुसरत गर्भवती असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दुसरीकडे नुसरतचा पती निखिल जैन याने आपल्याला तिच्या प्रेग्नंसीची माहिती नसल्याचे स्पष्ट करत जर तसे असेल तर ते मुल आपले नसल्याचे म्हटले आहे.

नुसरत जहाँचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाला आहे, यामध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे. ती ६ महिन्यांची प्रेग्नंट असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तिने अद्याप यावर चुप्पी साधली आहे.

निखिलने आपण तिच्यापासून खूप काळापासून दूर असल्याचे सांगितल्याने हे मुल कोणाचे यावर आता चर्चा होऊ लागली आहे.

निखील जैन यांनी पलटवार करत म्हटलंय की, लग्नाच्या एक वर्षाच्या काळात नुसरतचं वागणं बदललं. तिने लग्नापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरापासून नुसरतच्या स्वभावात बदल दिसला. २०२० मध्ये शुटींग नंतर नुसरतमध्ये हा बदल होऊ लागला.

विशेष म्हणजे २०२० मध्ये यश दासगुप्ता(Yash Dasgupta)च्या SOS Kolkata सिनेमाचं शुटींग सुरू होतं. तेव्हा नुसरत आणि यशच्या अफेअरबाबत खूप चर्चा झाली. नुसरतला मी अनेकदा लग्न भारतात रजिस्टर करण्यास सांगितले मात्र नुसरतनं प्रत्येकवेळी ते टाळलं असल्याचा दावा निखीलने केला.

ऑगस्ट २०२० मध्ये एका सिनेमाच्या शुटींगनंतर तिच्या स्वभावात बदल झाला त्यामागं कारण काय हे तिला चांगलेच माहिती आहे. आम्ही एकत्र असताना मी तिला आमचं लग्न रजिस्टर करण्याबद्दल बोलत होतो मात्र ती टाळाटाळ करत होती असं निखीलनं निवेदनात म्हटलं आहे.

नुसरतनं होम लोन घेतलं होतं. त्याच्या व्याजातून ती वाचावी यासाठी आमच्या फॅमिली अकाऊंटवरून मी तिच्या खात्यात काही पैसे ट्रान्सफर केले होते. मी तिला प्रेमासाठी ते पैसे दिले होते परंतु तिने जो आरोप केला तो अपमानाजनक आणि खोटा आहे, असेही निखिलने म्हटले आहे.

लग्नावेळी मला कुटुंबीयांनी दिलेले दागिने तसेच स्वकमाईतून मी घेतलेले दागिने, माझे कपडे, बॅगा आदी गोष्टी अजूनही निखिल यांनी त्यांच्याकडे ठेवून घेतल्या आहेत, असाही आरोप नुसरतने निय़खिलवर केला आहे.