1542 फुटांवरून उलटं वाहणारं पाणी, निसर्गाचा अद्भुत नजारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 12:34 PM2020-01-13T12:34:23+5:302020-01-13T12:37:50+5:30

जगभरात फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. काही निसर्गाच्या सौंदर्यानं परिपूर्ण आहेत. तसेच जगभरात अनेक सुंदर धबधबेसुद्धा आहेत, जे पाहण्यासाठी पर्यटक फार दुरून येतात.

मोठ्या डोंगरातून उंचावरून कोसळणारा फेसाळणारा धबधबा पाहिल्यावर मन प्रफुल्लित होते.

असाच एक कथित धबधबा सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यटकांच्या कुतूहलाचा विषय ठरतो आहे.

सरळ वरून खाली कोसळणारा धबधबा आपण पाहतोच, पण हा कथित धबधबा जरा हटके आहे. तो वरून खाली नव्हे, तर खालून वर जात असताना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे.

विशेष म्हणजे हा कोणताही धबधबा नसून समुद्राच्या लाटांचं पाणी हे गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेनं वर जाताना दिसतं आहे.

डेन्मॉर्कच्या फॅरो आयलँड (Faroe Island)समुद्र किनाऱ्यावरचं हे दृश्य आहे. या समुद्राला भरती आली असून, उंचच उंच लाटा उसळत आहेत.

. 41 वर्षांच्या सॅमी जॅकबसन यांनी ही दृश्यं टिपली असून, हा अद्भुत नजारा कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे.