पतीसोबत अवैध संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने युवतीचे केस कापले, व्हिडिओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 03:06 PM2021-08-08T15:06:21+5:302021-08-08T15:33:52+5:30

Extramarital Affair : गुजरातमधील सुरतमध्ये एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे एका महिलेने संपूर्ण गावासमोर एका मुलीचे केस कापले. घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

त्या महिलेला संशय आहे की, त्या मुलीचे तिच्या पतीसोबत अवैध संबंध आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (All photos - AajTak)

या व्हिडिओत काही महिला मुलीला धरून आहेत, तर एक महिला जबरदस्तीने तिच्या केसांवर कात्री चालवत आहे. पीडित मुलगी ओरडते आणि स्वतःला वाचवण्याची विनवणी करते, पण कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे येत नाही असे दिसत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ सुरतच्या पलसाना तहसीलच्या तातीथईया गावाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. येथे एका महिलेचे केस जबरदस्तीने कापले जातात. दरम्यान ती मुलगी स्वतःला वाचवण्यासाठी रडताना दिसली, पण तिला अनेक स्त्रियांनी इतके घट्ट पकडले, की तिला इच्छा असली तरी ती काहीही करू शकली नाही.

या मुलीला वाचवण्याऐवजी तिथे उपस्थित लोक या घटनेचा व्हिडिओ बनवताना दिसले, तर काही लोक हसत होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कडोदरा पोलीस कारवाईला लागले. पीडित मुलीचा जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. या प्रकरणाचा तपास करण्याबाबत पोलीस बोलत आहेत.

मात्र, पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी महिलेसह इतर लोकांना अटक केली आहे, ज्यात दोन पुरुष आरोपींचा समावेश आहे. सुरत एसपी ग्रामीण उषा राडा यांनी सांगितले की, महिलेला संशय आहे की, पीडित मुलीचे तिच्या पतीसोबत अवैध संबंध आहेत. या संशयामुळे महिलेने मुलीला पकडून केस कापले.

मुलीचे केस कापण्याचा मुख्य आरोपी, महिलेचे नाव सेकांती आहे. गौरी आणि इतर दोन महिलाही या घटनेत सेकांतीसह सहभागी होत्या. असे सांगण्यात आले आहे की, सेकांतीला संशय होता की मुलीचे तिच्या पतीशी अवैध संबंध आहेत, ज्यामुळे त्याचे या घटनेपूर्वी मुलीशी भांडण झाले होते.

या भांडणानंतर ती मुलगी मध्य प्रदेशातील तिच्या घरी गेली होती. काही दिवसांपूर्वी ती परत कडोदरा येथे आली होती, याबद्दल सेकांतीला कळले. यानंतर सेकांतीने या मुलीला पकडले. पीडित मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे, त्यानंतर तिचे केस कापण्यात आले.

आरोपी महिलांकडून मुलीला हे लज्जास्पद कृत्य केले जात असताना स्थानिक लोक या घटनेला पाठिंबा देत होते. येथे असलेल्या कपड्यांच्या दुकानाच्या मालकाने आरोपी महिलांना मुलीचे केस कापण्यासाठी कात्री दिली.