राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 21:01 IST
1 / 7राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली आहे. या हत्याकांडाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. 2 / 7मेघालय पोलिसांचे विशेष तपास पथक (SIT) आज सोनम रघुवंशीसह इतर आरोपींसह घटनास्थळी पोहोचले होते. एसआयटी पथकाने सोहरा येथे आरोपी सोनम रघुवंशी आणि तीन इतर आरोपींच्या उपस्थितीत पुन्हा एकदा क्राइम सीन (हत्येचे नाट्यरूपांतर) तयार केला. 3 / 7यासंदर्भात माहिती देताना पूर्व खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक (SP) विवेक सियेम म्हणाले, हत्या झाली त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्राइमसीन तयार केल्यानंतर, अणेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. आमच्या समोर एक क्लियर पिक्चर आहे. याशिवाय, राजाच्या हत्येत वापरण्यात आलेले आणखी एक धारदार शत्र (Machete) अत्याप हस्तगत करण्यात आलेले नाही.4 / 7विवेक सीयेम, 'आरोपींनी राजाला कसे मारले? हे पाहण्यासाठी आज एसआयटीने अनेक ठिकाणांना भेट दिली. आम्ही आरोपींच्या दुचाकी पार्क केलेल्या पार्किंग लॉटपासून सुरुवात केली. आम्ही व्ह्यूपॉईंटवर गेलो आणि हत्येच्या अगदी आधी कोण कुठे उभे होते? हे माहीत करून घेतले. 5 / 7पहिला वार कुणी केला? - २३ मे रोजी तीन वार करण्यात आले होते, पहिला विशालने, दुसरा आनंदने आणि शेवटचा आकाशने केला. आम्ही पुष्टी केली आहे की आणखी एक धारदार शस्र अद्याप सापडलेले नाही. आरोपींनी पुन्हा एकदा दाखवले की त्यांनी शत्र केस फेकले होते. एसडीआरएफ दुसरे शस्त्र शोधण्याचा प्रयत्न करत आहे.'6 / 7राजाच्या मोबाईल फोन - माध्यमांशी बोलताना एसपी विवेक सीयेम म्हणाले, 'राजाच्या मोबाईल फोनचे काय झाले हे आम्हाला समजले. आधी सोनम आणि नंतर विशालने तो खराब केला. ते येथू कसे बाहेर पडले हेही समजले. 7 / 7...अन् सोनम दूर झाली होती - राजावर शत्राने वार करण्यात आले होते, याची पुष्टी आम्ही केली आहे. पहिला वार विशाल उर्फ विक्कीने केला. जेव्हा राजाला मारले गेले आणि त्याच्या शरिरातून रक्त वाहू लागले, तेव्हा सोनम त्या ठिकाणावरून दूर झाली. यानंतर तिघांनी राजाचा मृतदेह दरीत फेकला.