शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

"आमच्याकडून मालीश करून घेतात, आक्षेपार्ह काम करायला सांगतात’’; होमगार्डचे वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 5:16 PM

1 / 5
वरिष्ठ अधिकारी आमच्याकडून मालीश करवून घेतात, तसेच चुकीची कामे करायला सांगतात, असा सनसनाटी आरोप होमगार्डमधील एका जवानाने केला आहे. उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथील एका होमगार्डने आपल्या विभागातील जिल्हा कमांडेट अधिकाऱ्यांवर हे आरोप केले आहेत. कमांडेट साहेब ड्युटीवर असताना तेल मालिश करायला लावतात. तसेच मद्यापान करण्यास भाग पाडतात. एवढेच नाही तर आपल्यासोबत आक्षेपार्ह कृत्य करण्यास सांगतात आणि तसे न केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देतात. दरम्यान जिल्हा कमांडेट अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र पीडित होमगार्डने या प्रकरणाची तक्रार होमगार्ड डिजी उत्तर प्रदेश यांच्याकडे केली आहे.
2 / 5
हे प्रकरण सदर बाजार ठाणे क्षेत्रातील चिनौर येथे बनलेल्या होमगार्ड कार्यालयातील आहे. पीडित होमगार्डचा आरोप आहे की, जिल्हा कमांडेट रमेश कुमार माझ्याकडून जबरदस्तीने तेल मालिश करवून घेतात. रात्री नॉन व्हेज बनवल्यानंतर मद्यप्राशन करण्यास भाग पाडायचे. तसेच आपल्यासोबत आक्षेपार्ह कृत्य करण्यास सांगायचे. तसे करण्यास नकार दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी द्यायचे.
3 / 5
पीडित होमगार्ड गेल्या बऱ्याच काळापासून सदर बाजार ठाण्याच्या क्षेत्रातील चिनौरमध्ये असलेल्या होमगार्ड कार्यालयात तैनात आहेत. पीडिताचे म्हणणे आहे की, त्यांनी कमांडेट रमेश कुमार यांना अनेकदा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा त्यांनी आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही तेव्हा. त्रस्त होऊन मी होमगार्ड डीजी यांच्याकडे तक्रार केली.
4 / 5
या प्रकरणी जिल्हा कमांडेट रमेश कुमार यांनी सांगितले की, त्यांच्यावर लावण्यात आलेले सारे आरोप खोटे आणि निराधार आहेत. सदर होमगार्ड कार्यालयात अनुपस्थित राहत असे. त्यामुळे आम्ही त्याला खडसावले होते. आता कुणाचे तरी ऐकून तो तक्रार करत आहे. जेव्हा तपास होईल तेव्हा सत्य समोर येईल.
5 / 5
दरम्यान, पीडित होमगार्डच्या या गंभीर तक्रारीनंतर विभागामध्ये गोंधळ माजला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू आहे. तर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पीडिताची तक्रार मिळाली आहे. तपासानंतरच या प्रकरणाचे सत्य समोर येईल. तसेच या प्रकरणात ज्याची चूक समोर येईल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, आता पीडित होमगार्डचे पत्र व्हायरल होत आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश