By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:48 IST
1 / 8इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडात रोजच्या रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. सोनमचे लग्न राजापूर्वी दुसऱ्याच कुठल्या मुलासोबत ठरले होते. मात्र, पंडितजींनी अथवा ज्योतिषाने कुंडली पाहून, असे काही सांगितले की, मुलाच्या कुटुंबाने लग्नास नकार दिला. आता राजा रघुवंशीच्या हत्येनंतर ते कुटुंब, त्या पंडितजी आणि देवाचे आभार मानत आहे. आपण येथे लग्न केले नाही, हे चांगलेच झाले आणि मुलगा वाचला, असे संबंधित कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे. सोनमवर राजा रघुवंशीच्या हत्येचा आरोप आहे.2 / 8न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, आता संबंधित कुटुंबही समोर आले आहे. राजापूर्वी या कुटुंबात सोनम रघुवंशीचे लग्न जवळजवळ निश्चितच झाले होते. दोन्ही कुटुंबांची पसंतीही झाली होती. मात्र, प्रकरण कुंडलीवर अडकले. 3 / 8संबंधित वृत्तानुसार, जेव्हा सोनमची कुंडली एका ज्योतिषीला दाखवण्यात आली तेव्हा, या मुलीच्या कुंडलीत पतीच्या हत्येचा योग आहे, असे ज्योतिषाने सांगितले. हे ऐकून संबंधित कुटुंब गडबडले आणि त्यांनी काही कारण सांगून हे लग्न रद्द केले.4 / 8सोनम मांगलिक आहे आणि तिचा विवाह मांगलिक योग असलेल्या राजा रघुवंशीशी निश्चित झाला होता. त्यांच्या लग्नाचा विषय रघुवंशी समाजाच्या एका मासिकातून सुरू झाली. या मासिकात दोन्ही कुटुंबांनी नोंदणी केली होती. राजा आणि सोनमचे लग्न ११ मे रोजी झाले होते. १० दिवसांनी दोघेही हनिमूनला गेले होते. 5 / 8हनिमूनवर असतानाच २३ मे रोजी राजाची हत्या करून त्याचा मृतदेह दरीत फेकून देण्यात आला होता. २ जून रोजी त्याचा मृतदेह सापडला. नंतर, सोनमला तिच्या पतीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. असा आरोप आहे की तिने तिचा कथित प्रियकर राज आणि त्याच्या तीन मित्रांसह पतीची हत्या केली.6 / 8राजावर कुणी कुणी केले वार? पहिला वार कुणी केला? - यासंदर्भात मंगळवारी माहिती देताना पूर्व खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक (SP) विवेक सियेम म्हणाले, हत्या झाली त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्राइमसीन तयार केल्यानंतर, अणेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. आमच्या समोर एक क्लियर पिक्चर आहे. २३ मे रोजी तीन वार करण्यात आले होते, पहिला वार विशालने, दुसरा आनंदने आणि शेवटचा आकाशने केला होता. 7 / 8सोनम कुठे उभी होती? - राजावर शस्त्राने वार करण्यात आल्याची पुष्टी आम्ही केली आहे. पहिला वार विशाल उर्फ विक्कीने केला. जेव्हा राजाला मारले गेले आणि त्याच्या शरिरातून रक्त वाहू लागले, तेव्हा सोनम त्या ठिकाणावरून दूर झाली. यानंतर तिघांनी राजाचा मृतदेह दरीत फेकला.8 / 8सोनम कुठे उभी होती? - राजावर शस्त्राने वार करण्यात आल्याची पुष्टी आम्ही केली आहे. पहिला वार विशाल उर्फ विक्कीने केला. जेव्हा राजाला मारले गेले आणि त्याच्या शरिरातून रक्त वाहू लागले, तेव्हा सोनम त्या ठिकाणावरून दूर झाली. यानंतर तिघांनी राजाचा मृतदेह दरीत फेकला.