बापरे! आता दहशतवाद्यांचे आवडतं शस्त्र बनलीय 'ही' अमेरिकन रायफल, खासियत वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 07:25 PM2020-06-24T19:25:10+5:302020-06-24T19:49:04+5:30

चकमकीत ठार झालेल्या जैश ए मोहम्मदच्या  दहशतवाद्यांकडून एम -4 कार्बाईन रायफल मिळाली आहे. अशी शस्त्र पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना पाठवले जात आहे. याचे कारण हे अमेरिकन शस्त्र चालविण्याचे दहशतवाद्यांना चांगले प्रशिक्षण मिळाले आहे. हे त्याचे आवडते हत्यार बनले आहे. डीजीपी दिलबाग सिंह यांनी ही माहिती दिली.

दहशतवाद्यांचे अमेरिकन एम ४ रायफल आवडतं हत्यार बनण्यामागे काही खास वैशिष्ट्ये आहेत, जाणून घ्या एम -4 रायफलची वैशिष्ट्ये (All Photos - Amar Ujala)

कुलगाममधील चकमकीचा संदर्भ देताना डीजीपी दिलबाग सिंह यांनी माहिती दिली की, तीन दिवसांपूर्वी ऑपरेशनमध्ये ठार केलेल्या इम्रान भाई नावाच्या पाकिस्तानी जैशच्या  दहशतवाद्याकडून दोन शस्त्रे जप्त करण्यात आली होती. 

त्यातील एक एम -4 रायफल होती. हे दहशतवाद्यांना जास्त अंतरावरुन हल्ले करण्यास उपयोगी पडते, कारण या रायफलवर निशाण्यासाठी साइट लावण्यात आली आहे.

डीजीपी म्हणाले की, सुरक्षा दलाकडून आतापर्यंत जप्त केलेली सर्व शस्त्रे यातील बहुतांश एम -4 रायफल आहेत. अजूनही जिवंत असलेल्या सर्व दहशतवाद्यांकडे समान शस्त्रे आहेत. आयबी किंवा एलओसीमार्फत जैश आणि इतर दहशदवादी काश्मीरमध्ये पाठविण्याचा पाकिस्तान प्रयत्न करीत आहे.

डीजीपी यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानकडून चार दिवसांपूर्वी ही शस्त्रे ड्रोनच्या माध्यमातून हिरानगर सेक्टरमध्ये पाठविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बीएसएफच्या जवानांनी हे ड्रोन पडले. अलीकडेच काश्मीर रेंजच्या आयजीपीनेही सांगितले की, हीरानगरहून पाठवलेली एम -4 रायफल शोपियांमध्ये सक्रिय असलेल्या अली भाई नावाच्या पाकिस्तानी जैशच्या  दहशतवाद्यासाठी पाठवले होते. 

एम -4 चे वजन कमी आहे. त्याचे उत्तम वैशिष्ट्य म्हणजे कस्टमायझेशन. त्यात बर्‍याच गोष्टी जोडल्या जाऊ शकतात.

दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करूनही यश न मिळण्याच्या प्रश्नावर डीजीपी म्हणाले की, कट्टर दहशतवाद्यांच्या दबावामुळे अन्य दहशतवादी शरण येण्यास घाबरतात असे त्यांना वाटते.

एम -4 दूरवर निशाणा साधण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. याची अग्निशामक शक्ती सुमारे 600 मीटर आहे तसेच एकाचवेळी सतत ९५० गोळ्या या रायफलमधूल झाडल्या जाऊ शकतात.