शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोलिसांनी रोखताच दुचाकीस्वार पळू लागले, पकडले असता ४४० हिरे सापडले, किंमत वाचून बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 7:45 PM

1 / 5
दुचाकीवरून होणाऱ्या हिऱ्यांच्या तस्करीचा भांडाफोड पोलिसांनी केला असून, या तस्करांकडून पोलिसांनी सुमाने ४४० हिरे जप्त केले आहेत. या हिऱ्यांची किंमत सुमारे ५० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हिरे तस्कर स्कूटीवरून हे हिरे छत्तीसगडमधील फिंगेश्वरमार्गे रायपूरला नेत होते.
2 / 5
या हिरे तस्करांना पोलिसांनी वाटेत रोखल्यावर ते घाबरले आणि मागे वळून पळण्याचा प्रयत्न करू लागले. दरम्यान, पोलिसांनी त्यांना पकडून तपासणी केली असता त्यांच्यांकडे तब्बल ४४० हिरे सापडले. एकाच वेळी ४४० हिरे सापडण्याची छत्तीसगडमधील ही पहिलीच वेळ आहे.
3 / 5
यापूर्वी गरियाबंद जिल्हा पोलिसांनी गेल्या दीड वर्षांत ७ विविध ठिकाणांवरून ६७२ हिरे जप्त केले होते. आतापर्यंत दीड कोटी मूल्याचे तब्बल ११०० नग हिरे पोलिसांनी जप्त केले आहेत. जिल्ह्यातील मैनपुरी परिसरातील पायलीखंड नावाची हिऱ्याची खाण आहे. तिथून दररोज अवैध खोदकाम करून हिरे काढले जातात.
4 / 5
अवैध खाणकाम करणाऱ्यांकडून हे हिरे कमी किमतीत खरेदी केले जातात. त्यानंतर त्यांची मोठ्या शहरांमध्ये विक्री केली जाते. मात्र यावेळी जेवढ्या मोठ्या प्रमाणात हिरे जप्त झाले आहेत. ते पाहून यामागे काही मोठ्या लोकांचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
5 / 5
पोलिसांनी दोन तस्करांना अटक केली आहे. आता त्यांच्याकडील मोबाईल कॉल्सची माहिती तपासली जात आहे. आता हे तस्कर खाण क्षेत्रातील कुणाकडून हे हिरे खरेदी करायचे आणि रायपूरमध्ये कुणाला विकायला जात होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगडIndiaभारत