1 / 5जिथे एका १३ वर्षाच्या निरागस मुलीने बाळाला जन्म दिला. सातवीत शिकणार्या तिच्या वर्गमित्राने तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला होता.2 / 5ही बाब नदियाच्या धनताला पोलिस ठाण्यासमोर आली आहे. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपी आपल्या कुटुंबासमवेत बांगलादेशात पळून गेला आहे. आरोपीचे आजोबा बांगलादेशात राहतात.3 / 5 पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तिच्या वर्गमित्रांनी इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीचे लैंगिक शोषण केले आणि त्यानंतर मोबाइल फोनमध्ये हे फोटो सेव्ह करून ब्लॅकमेल केले.4 / 5या प्रकरणात पीडितेची आई घाबरली आहे आणि तिला न्याय हवा आहे. पीडितेच्या कुटूंबाने धनताला पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे.5 / 5या तक्रारीच्या आधारे संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात आरोपी फरार आहे.