शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ड्रग्ज प्रकरणी रागिणी द्विवेदी या अभिनेत्रीच्या घरी छापेमारी, जाणून घ्या ती कोण आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 3:54 PM

1 / 8
कन्नड चित्रपटसृष्टीतील ड्रग्ज प्रकरणी चौकशी करणार्‍या बेंगळुरूच्या सेंट्रल क्राइम ब्रँचने (सीसीबी) शुक्रवारी सकाळी अभिनेत्री रागिणी द्विवेदी हिच्या निवासस्थानी छापा टाकला, अशी माहिती पोलिसांनी दिली. (All Photos - Twitter Account of Ragini Dwivedi - @raginidwivedi24)
2 / 8
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सीसीबीने कोर्टाकडून सर्च वॉरंट मिळवले. त्यानंतर तिच्या घराची झाडाझडती घेतली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीसीबी पथकांची टीम पहाटे सहाच्या सुमारास रागिणी द्विवेदी हिच्या निवासस्थानी पोहोचली.
3 / 8
सीसीबीने बुधवारी अभिनेत्रीला नोटीस बजावली होती आणि गुरुवारी तिला हजर राहण्यास सांगितले होते, परंतु तिने सोमवारीपर्यंत वेळ मागण्यासाठी वकिलांची टीम पाठविली. शुक्रवारी पोलिसांनी तिला त्यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले.
4 / 8
सीसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, ही अभिनेत्री सकाळी दहा वाजता तपास अधिकाऱ्यांच्या पथकासमोर हजर होईल. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, त्यांनी ड्रग्ज प्रकरणी कन्नड फिल्म इंडस्ट्रीत परिचित असलेल्या रवीला अटक केली आहे आणि कोर्टाने त्याला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे.
5 / 8
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) कन्नड चित्रपटसृष्टीत गायक आणि अभिनेत्यांना ड्रग्ज पुरवणाऱ्या तीन जणांना अटक केल्यानंतर सीसीबीने बंगळुरुमधील अमली पदार्थसंबंधी चौकशीचा तपास तीव्र केला.
6 / 8
चित्रपट निर्माते आणि पत्रकार इंद्रजित लंकेश यांनी सीसीबीला अमली पदार्थांच्या गैरवापराबाबत आपला जबाब दिला होता. त्यात त्यांनी या इंडस्ट्रीतील किमान 15 लोक या प्रकरणात सहभागी असल्याचा दावाही केला होता.
7 / 8
रागिणीचा जन्म बेंगळुरूमध्ये झाला असून २००९ मध्ये तिने कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. केम्पे गोवडा, रागिनी आयपीएस, बंगारी आणि शिवा या चित्रपटांमधील भूमिकांमुळे ती प्रकाशझोतात आली. रागिनीने काही दिवसांपूर्वीच ड्रग्सबद्दल ट्विट केलं होतं.
8 / 8
त्या ट्विटमध्ये तिने ड्रगसारख्या समस्येचं लवकरच समाधान व्हायला पाहिजे असं म्हटलं होतं.
टॅग्स :raidधाडDrugsअमली पदार्थBengaluruबेंगळूर