बाबो! ६ वर्षाच्या मुलाने केली तब्ब्ल ६७ लाखांची चोरी, आई - बापाने दिले होते प्रशिक्षण 

By पूनम अपराज | Published: December 16, 2020 06:44 PM2020-12-16T18:44:47+5:302020-12-16T19:16:44+5:30

Robbery : सहा वर्षांच्या मुलाने 67 लाख रुपयांचा माल चोरला. या चोरीसाठी त्याला पालकांनी प्रशिक्षण दिले होते. आई-वडिलांनी सांगितलेल्या मार्ग स्वीकारत मुलाने दुकानातून 18 कॅरेट सोन्याचे घड्याळ चोरले.

चोरीची घटना घडण्यापूर्वीच इली पारा  आणि मार्टा पॅरा लक्झरी स्टोअरमध्ये गेले होते आणि त्यांनी त्याचवेळी घड्याळाचा फोटो क्लिक केला होता. पाच दिवसांनंतर, ते दाम्पत्य आपल्या सहा वर्षाच्या मुलासह स्टोअरमध्ये गेले आणि यादरम्यान मुलाने मौल्यवान घड्याळ चोरले.

खरं तर, दाम्पत्याने आपल्या मुलाला बनावट घड्याळ घेऊन पाठवले होते, जे त्याने चोरीच्या घड्याळाच्या जागेवर ठेवले होते. यामुळे स्टोअरच्या कर्मचार्‍यांना ही चोरी त्वरित पकडता आली नाही. दुसर्‍या दिवशी एका कर्मचाऱ्याने घड्याळ बदलताना पाहिले तेव्हा त्याने पोलिसांना माहिती दिली.

रोमानियाचा रहिवासी असलेले हे जोडपे चोरीच्या घटनेनंतर ब्रिटन सोडून जाण्याच्या प्रयत्नात होते, परंतु फरार होण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना अटक केली.

या जोडप्याने 19 सप्टेंबर 2020 रोजी आपल्या लहान मुलाच्या माध्यमातून चोरीची घटना घडवून आणली होती.

या गुन्ह्यासाठी कोर्टाने मुलाच्या वडिलांना 18 महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावली, तर आईला 8 महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

Read in English