Aryan Khan And Ananya Panday: आर्यन खानने अनन्या पांडेकडून अरेंज केला गांजा! मित्रांना NCB ची भीती घातली; नवीन चॅटमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 11:56 AM2021-10-26T11:56:27+5:302021-10-26T12:06:34+5:30

Mumbai Cruise Aryan Khan Drugs Case: आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातील एक नवीन चॅट समोर आले आहे.

मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे. या प्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

या प्रकरणी आर्यनची मैत्रीण आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे (Ananya Pandey) हिची चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीदरम्यान अनन्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला असून, आर्यनला कोणती व्यक्ती ड्रग्ज पुरवायचा याचे नाव सांगितल्याचे म्हटले जात आहे.

यातच आता ड्रग्जसंदर्भात आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातील एक नवीन चॅट समोर आले आहे. या चॅटमध्ये आर्यन खानने अनन्य पांडेच्या माध्यमातून गांजा अरेंज केला होता. तसेच या चॅटमध्ये NCB चा उल्लेख करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातील धक्कादायक आणि आश्चर्यजनक व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट समोर आल्याचे म्हटले जात आहे. हा स्क्रीनशॉट एका ग्रुपमधील असून, यामध्ये आर्यन खानला कोकेन टुमॉरो याचा प्रस्ताव देण्यात आला असून, दुसऱ्या एका चॅटमध्ये NCB च्या नावाने आपल्या मित्रांना धमकावत असल्याचे समोर येत आहे.

आर्यन खान व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अचित कुमारकडून ड्रग्ज खरेदी करण्याबाबत चर्चा करत असून, सुमारे ८० हजार रुपयाचे ड्रग्ज मागवत असल्याचे चॅटमध्ये दिसत असल्याचे समोर येत आहे. तसेच आर्यन खान आणखी काही जणांशी ड्रग्जबाबत चर्चा करत असल्याचे चॅटमधून समोर आले आहे.

NCB कडे आर्यन खानने अनन्या पांडे आणि अन्य तीन स्टार किड्सशी ड्रग्ज खरेदी किंवा घेण्याबाबत केलेले व्हॉट्सअॅप चॅट्स उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. याच प्रकरणी NCB अनन्या पांडेची चौकशी करत आहे. एनसीबीला ठोस पुरावे सापडले तर अनन्या पांडेला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दरम्यान, NCB कडून अनन्याची सलग दोन दिवस तब्बल ६ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये अनन्याने अनेक गौप्यस्फोट केले. तिने दिलेल्या या माहितीच्या आधारावर एनसीबीने एका २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. याच व्यक्तीने आर्यनपर्यंत ड्रग्स पोहोचवले असा खुलासा अनन्याने केला आहे.

अनन्याने आर्यनला ड्रग्स पुरवणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगितल्यानंतर एनसीबीने या तरुणाची चौकशी केली. या चौकशीमध्ये या तरुणानेदेखील काही खुलासे केले आहेत. याशिवाय एनसीबीकडून आर्यन खानच्या बँक अकाऊंटची तपासणी करण्यात येत आहे.

आर्यनने ऑनलाइन ट्रांजक्शनच्या माध्यमातून पेमेंट करुन ड्रग्जची खरेदी तर केली नाही ना याचा तपास एनसीबी करत आहे. जर त्याने ड्रग्जसाठी ऑनलाइन पेमेंट केले असेल तर ते कोणाच्या खात्यात ट्रान्सफर केले याचा शोध घेतला जाणार आहे.

दुसरीकडे नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याबाबत अजून एक मोठा आणि अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. समीर वानखेडेंच्या कारवायांबाबत एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करता पाठवलेले पत्र प्रसिद्ध करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केला आहे.

एनसीबीमधील एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या निनावी पत्रामधील मजकूर येथे आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटिक्स यांना पाठवणार आहे. आता समीर वानखेडेच्या चौकशीमध्ये हे पत्र समाविष्ट करण्याची विनंती केली आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

तर, भाजपा नेते मोहित कंबोज यांनी एक नवा व्हिडिओ ट्विट करत खळबळजनक दावा केला आहे. रामजी गुप्ता नावाच्या व्यक्तीचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले असून, यात प्रभाकर साईलने किरण गोसावीकडे पैशांची मागणी केली होती आणि त्याने ते दिले नाहीत म्हणून प्रभाकर साईल आता आरोप करतोय, असे रामजी गुप्ता नावाचा व्यक्ती बोलत या व्हिडिओत बोलत असल्याचे मोहित कंबोज यांचे म्हणणे आहे.

Read in English