शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sachin Vaze:...अन् मित्रानेच काटा काढला; सचिन वाझे-मनसुख हिरेन यांची पहिली भेट कशी आणि कधी झाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 8:39 AM

1 / 10
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्याबाहेर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी जिलेटीनने भरलेली स्फोटकांनी गाडी ठेवली होती, ही गाडी मनसुख हिरेन यांची होती, हिरेन यांनी गाडी चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती, परंतु ४ महिने ही गाडी सचिन वाझे वापरत असल्याचं तपासात समोर आलं.
2 / 10
सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांचा भूतकाळ पाहणं गरजेचे आहे, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, वाझे हे मूळचे कोल्हापूरचे आहेत, जेव्हा त्यांनी पोलीस परीक्षा पास केली, त्यानंतर एक वर्ष नाशिक पोलीस अकादमीत ट्रेनिंग घेऊन १९९० मध्ये त्यांची पहिली पोस्टींग ठाण्यात झाली.
3 / 10
ठाण्यात मुंब्रा, नौपाडा पोलीस स्टेशन येतात. त्याठिकाणीही त्यांची बदली झाली होती, नौपाडा येथे मनसुख हिरेन यांचे कार डेकोरेशनचं दुकान आहे, दोघांची ओळख याच कार दुकानात झाली होती. सचिन वाझेच घर ठाण्यात साकेत बिल्डिंगमध्ये आहे, त्याठिकाणाहून काहीच अंतरावर हिरेन यांचे दुकान आहे.
4 / 10
ज्यावेळी सचिन वाझे यांची ठाण्यातून मुंबई येथे बदली झाली, तेव्हा मनसुख हिरेन यांच्या दुकानाच्या वाटेवरून ते मुंबईकडे कामाला जात असे, तेव्हा नेहमी मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांची दुकानात भेट होती. त्यानंतर बॉम्बस्फोटातील आरोप ख्वाजा युनूस प्रकरणात २००४ मध्ये सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आलं, त्यानंतर ठाण्यात वाझेने लीगल कंपनी उघडली.
5 / 10
या कंपनीचं ऑफिस हिरेन यांच्या दुकानाजवळ होतं, त्यामुळे पोलीस दलात नसतानाही सचिन वाझे मनसुख हिरेन यांच्या दुकानावर येतजात असत. त्यामुळे हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात मैत्री झाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झालं, तेव्हा सचिन वाझेला पुन्हा पोलीस दलात घेतलं.
6 / 10
सचिन वाझेला पोलीस पॉवर मिळाल्यानंतर मनसुख हिरेन यांनीही मैत्रीच्या बहाण्याने वाझेकडून अनेकदा मदत घेतली होती. एका अधिकाऱ्यानुसार, मनसुख हिरेन यांची ठाण्यात वंदना थिएटरजवळ कार डेकोरेटरचं दुकान आहे, ही जागा ठाण्यातील प्राईम ठिकाणांपैकी एक आहे.
7 / 10
याठिकाणी पूर्वी ३ पेट्रोल पंप होते, आता २ दोन आहेत, जेव्हा कधीही लोक नवीन, जुनी गाडी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी येत तो सीट कव्हर बदलणे, म्युझिक सिस्टम किंवा कार डेकोरेट करण्यासाठी मनसुख हिरेन यांच्या दुकानावर येत होते.
8 / 10
हिरेन यांच्या दुकानात येणारे ग्राहक सर्वसामान्यांप्रमाणे काही पोलीस कर्मचारी, स्थानिक राजकीय नेतेही होते, त्यामुळे मनसुख हिरेन यांची प्रतिष्ठीत लोकांसोबत ओळख होती, अनेक लोक गाडी डेकोरेट केल्यानंतरही कित्येक महिने पैसै देत नव्हते. तेव्हा हिरेन पोलीस आणि स्थानिक नेत्यांकडून अशा व्यक्तींवर दबाव टाकत होते.
9 / 10
ज्या स्कोर्पिओ गाडीत जिलेटिन ठेवले होते, त्या गाडीचे मूळ मालक डॉक्टर पीटर न्यूटन हे हिरेन यांच्याकडे काही वर्षापूर्वी गाडी डेकोरेट करण्यासाठी आले होते, जेव्हा पेमेंटवरून न्यूटन आणि मनसुख हिरेन यांच्यात वाद झाला. तेव्हा मनसुख हिरेन यांनी सचिन वाझेंकडे मदत मागितली. तेव्हा वाझेच्या दबावामुळे ही स्कोर्पिओ मनसुख हिरेन यांच्याकडे राहिली.
10 / 10
सचिन वाझेची मदत झाल्यामुळे हिरेन यांनीही वाझेंची मदत केली, सचिन वाझेने नोव्हेंबर ते ५ फेब्रुवारीपर्यंत ही स्कोर्पिओ त्यांच्याकडे जवळ ठेवली, त्यानंतर ती हिरेन यांना परत दिली. आता तपासात हे सगळं प्लॅनिंग होतं हे समोर आलं आहे.
टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझेMukesh Ambaniमुकेश अंबानी