शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मनसुख हिरेन यांना का मारलं?; अखेर रहस्याचा उलगडा; NIAनं गूढ उकललं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 11:16 AM

1 / 9
उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर फेब्रुवारी महिन्यात स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानं एकच खळबळ उडाली. जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली कार, ही कार पार्क करण्यात पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा असलेला हात, कार मालक मनसुख हिरेन यांची हत्या अशा अनेक गोष्टी त्यानंतर उघडकीस आला.
2 / 9
अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो कारचं प्रकरण गाजलं. राजकारणात एकच खळबळ उडाली. प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेनं हाती घेताच सचिन वाझेला अटक केली. वाझे सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणी एनआयएनं न्यायालयात महत्त्वाची माहिती दिली आहे.
3 / 9
अंबानींच्या अँटिलिया बंगल्याबाहेरील स्फोटकांनी भरलेली कार, त्यानंतर कार मालक हिरेन यांची झालेली हत्या आणि त्यात असलेला वाझेचा सहभाग यावरून पोलीस दलात खळबळ उडाली. पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यानंतर आता एनआयएनं हिरेन यांची हत्या का झाली याची माहिती विशेष न्यायालयाला दिली आहे.
4 / 9
सराईत गुन्हेगारांना सुपारी देऊन हिरेन यांची हत्या घडवून आणली गेली, असा खळबळजनक खुलासा एनआयएनं केला आहे. हिरेन यांना मारण्यासाठी ४५ लाखांची सुपारी देण्यात आल्याचं एनआयएनं सांगितलं आहे.
5 / 9
अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली. ही कार हिरेन यांच्या मालकीची होती. कार सापडल्यामुळे हिरेन घाबरले होते. त्यामुळे पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्यांची हत्या केल्याचा दावा एनआयएनं केला आहे.
6 / 9
२५ फेब्रुवारीला अँटिलियाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळून येताच सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली. कार हिरेन यांच्या नावावर असल्यानं ते घाबरले. त्यांनी चौकशीसाठी अनेकदा बोलावण्यात आलं. त्यामुळे भीती आणखी वाढली.
7 / 9
मनसुख हिरेन यांनी चौकशी दरम्यान तोंड उघडल्यास आपलं पितळ उघडं पडेल अशी भीती मुख्य आरोपींना वाटत होती. त्यामुळे त्यांनी सराईत गुन्हेगारांना मनसुख यांच्या खुनाची सुपारी दिली.
8 / 9
मनसुख यांचा मृतदेह ठाण्यातल्या रेतीबंदर खाडी परिसरात ५ मार्चला आढळून आला. हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं भासवण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला होता.
9 / 9
अँटिलिया स्फोटक प्रकरणात हिरेन यांची कार वापरली गेल्यानं त्यांना या कटाबद्दल बरीचशी माहिती होती. ती माहिती त्यांनी चौकशीत सांगू नये म्हणूनच त्यांचा खून करण्यात आल्याचं एनआयएनं विशेष न्यायालयाला सांगितलं.
टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा