शिवलिंग प्राप्तीसाठी बंद खोलीत दोन भावांची अघोरी प्रथा; एका भावाचा मृत्यू झाला अन् दुसरा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 05:31 PM2020-08-19T17:31:28+5:302020-08-19T17:35:52+5:30

यूपीमध्ये अंधश्रद्धेद्वारे शिवलिंग प्राप्त करण्यासाठी दोन भावांनी घरच्या आतल्या खोलीत तंत्र विद्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात मांत्रिकावेळी एका भावाचा मृत्यू झाला.

भावाच्या मृत्यूनंतरही दुसऱ्या भावाने त्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी मंत्रतंत्राचा वापर केला. अनेक दिवसांपासून भावाचा मृतदेह घराच्या खोलीत पडून होता.

मात्र, ग्रामस्थांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घरात घुसून मृतदेह ताब्यात घेतला आणि भावाला अटक केली. उर्वरित कुटूंबातील सदस्यांचीही चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लखनऊच्या इटोंजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. उसर्णा गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बृजेश रावत हा त्याच्या पत्नी आणि ३ मुलांसमवेत येथे राहत होते. भाऊ आणि आईसुद्धा घरात त्यांच्याबरोबर राहत होते.

कुटूंबाच्या म्हणण्यानुसार ब्रिजेश रावत आणि त्याचा भाऊ फूलचंद यांनी शिवलिंग प्राप्त करण्यासाठी खोलीत कुलूप लावून तंत्र विद्या सुरू केली. यानंतर ब्रिजेश रावत नग्न होऊन खोलीत तंत्रमंत्र करत होता. या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृत्यूनंतर भाऊ फूलचंद याने आपल्या भावाला पुन्हा जिवंत करण्यासाठी तंत्र विद्या सुरू केली आणि कुटुंबातील सदस्यांना धमकी दिली की जर कोणी या तंत्रात विघ्न आणलं तर त्याचा नाश होईल. त्यानंतर फूलचंद आपल्या भावाच्या मृतदेहासह एका खोलीत तंत्रविद्या करत राहिला.

शेजार्‍यांना जेव्हा बृजेश रावत याची चौकशी केली असता ही माहिती उघडकीस आली पण काहीच प्रतिसाद न मिळाल्याने आणि दरवाजा उघडला नसल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावलं.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बराच वेळ दार ठोठावले पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर घराचा दरवाजा तोडला, तेव्हा आतमध्ये ब्रिजेशचा मृतदेह तसाच पडला होता. आणि त्याचा भाऊ फूलचंद त्याच्या शेजारी तंत्रमंत्र ध्यान करत असल्याचे आढळून आले. तथापि, इतके दिवस ब्रिजेशचा मृतदेह पडून राहिल्याने त्याचा खूप वास येत होता. त्यामुळे त्याच्यावर पोस्टमॉर्टम करणे देखील कठीण झाले.

एसपी आदित्य लेहंगा यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही भाऊ शिवलिंग प्राप्तीसाठी तंत्र विद्या करीत होते, यादरम्यान ब्रिजेशचा मृत्यू झाला. त्याच्या छळ झाल्याने मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. यानंतर अंधश्रद्धेमुळे मृतदेहाला पुन्हा जिवंत करण्यासाठी त्याच्या भावाने तंत्रमंत्र सुरू केला आणि कुटुंबातील सदस्यांनाही कोणाला न सांगण्याची धमकी दिली.

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि फूलचंदला ताब्यात घेतले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून पुढील कारवाई केली जात आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, फूलचंद आणि त्याचा भाऊ बराच काळ तंत्र मंत्रांचा जप करत होते आणि सातव्या दिवशी त्याचा भाऊही तंत्र मंत्राने जिवंत होईल असे फूलचंद म्हणत होता

Read in English

टॅग्स :पोलिसPolice