फक्त नावाच गुडिया... चॅलेंज देणाऱ्या बॉम्बरच्या मुसक्या आवळणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची कहाणी, पतीही डीआयजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 02:09 PM2021-12-30T14:09:37+5:302021-12-30T14:24:56+5:30

Inspiring Story Of Lady IPS : भागलपूर - बिहारमध्ये ३१ आयपीएस अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली. यापैकी १३ अधिकाऱ्यांना डीआयजी पदावर बढती मिळाली. यापैकी एक नाव भागलपूरच्या एसएसपी निताशा गुडियाचे देखील आहे, ज्यांना लेडी सिंघम म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती सत्यवीर सिंग यांनाही डीआयजी पदी रुजू करण्यात आले.

निताशाचे शिक्षण दिल्लीत झाले - निताशा मूळची दिल्लीची असून तिचे वडील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमधून निवृत्त झाले आहेत. पती-पत्नी दोघेही 2008 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बॅचलर पदवी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज (TISS) मधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. (All Photos - Social Media)

युपीच्या हरदोई येथील आयपीएसशी लग्न केले - आयपीएस निताशा गुडियाचे लग्न यूपीच्या हरदोई जिल्ह्यातील पलिया गावात झाले आहे. त्यांचे पती सत्यवीर सिंह यादव हे शिक्षक अशोक यादव यांचे पुत्र आहेत.

त्यांचे शिक्षण पलिया गावातच झाले. निताशासोबत तिचे आयपीएस पती सत्यवीर सिंह यादव यांनाही बढती देऊन डीआयजी पद देण्यात आले.

आव्हान देणाऱ्या बॉम्बरची केली अटक - निताशाला भागलपूरची एसएसपी होऊन एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. येथे एका बॉम्बरने सोशल मीडियावर अटक करण्याचे आव्हान दिले, त्यानंतर लोकेशन ट्रेस केले आणि नागपूर, महाराष्ट्र येथून अटक केली.

उत्कृष्ट कामासाठी सन्मान - IPS निताशा गुडिया हिची पोलीस सेवेबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक 2021 साठी उत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 15 ऑगस्ट रोजी त्यांचा गौरव करण्यात आला.