शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोपट उडून गेल्याच्या रागात पतीने पत्नीला केली मारहाण; सासरी जाऊन घराचीही केली तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 7:02 PM

1 / 5
उत्तर प्रदेशमधील अमरोहामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरातील पोपट उडून गेल्याच्या रागात एका तरुणाने सासरी जाऊन पत्नी आणि तिच्या परिवाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर त्या संतप्त तरुणाने घराची तोडफोड केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
2 / 5
अमरोहा जिल्ह्यातील औद्योगित नगरमधील गजरौला पोलिस स्थानकात तीन महिलांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
3 / 5
पत्नी नाजनीन यांनी सांगितले की, माझ्या पतीने काही दिवसांपूर्वी घरी पोपट आणला होता. ज्याला माझ्या आईने पाळले होते. माझ्या आईच्या घरुन घेऊन जाताना पतीच्या हातातून त्या पोपटाने पळ काढला. रात्री माझे पती आणि त्यांच्या घरातल्या सदस्यांनी त्या पोपटाला शोधत होते. मात्र याचदरम्यान आमच्या एका शेजारी राहणाऱ्या तरुणाला हा पोपट दिसल्याने त्याने माझ्या भावाला माहिती दिली. त्यानंतर माझ्या भावाने त्या पोपटाला पुन्हा घरी आणले.
4 / 5
पत्नी या घटनेची माहिती देताना पुढे म्हणाली की, माझ्या भावाच्या हातात पोपट दिसल्यानंतर अचानक माझ्या पतीने घरी येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच घराची तोडफोड देखील केल्याचे पत्नीने सांगितले आहे. आम्ही या संबंधित पोलिसांत तक्रार करायला गेलो तर पोलिसांनी माझ्या भावालाच अटक केली आहे.
5 / 5
यानंतर या घटनेबाबत पोलिस निरिक्षक अजय प्रताप सिंह यांनी माहिती दिली की, हे स्त्रियांचे प्रकरण होते, ज्यामध्ये एकमेकांमध्ये वाद निर्माण झाला होता. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही आणि ती एक सामान्य घटना होती, असं पोलिसांनी सांगितले.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस