शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आधी हात कापला, नंतर डोक्याला, मानेवर केले वार... क्लिनिकमध्ये घुसून डॉक्टरची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 9:49 PM

1 / 7
एका व्यक्तीने दिवसाढवळ्या डॉक्टरवर तलवारीने हल्ला केला आणि निर्घृणपणे त्याची हत्या केली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. (All Photos - AajTak)
2 / 7
डॉक्टर मुनेंद्र प्रताप वर्मा हरगाव पोलीस स्टेशन परिसरातील मुद्रासन गावात असलेल्या खासगी रुग्णालयात रुग्णांची सेवा करत होते, तेव्हा एक व्यक्ती तलवार घेऊन क्लिनिकमध्ये घुसली. त्या माणसाने आपली तलवार काढली आणि डॉ. मुनेंद्रवर हल्ला करायला सुरुवात केली. कसा तरी दरवाजा उघडून डॉक्टराने मदतीसाठी हाक मारली.
3 / 7
असे सांगितले जात आहे की, आरोपींनी तलवारीने डॉ. मुनेंद्र प्रताप वर्माचा हात कापला, त्यानंतर त्याच्या डोक्यावर आणि मानेवर अनेक वार केले. मग डॉक्टरांनी मदतीसाठी हाक मारली. यानंतर, क्लिनिकमध्ये उपस्थित असलेले त्याचे कर्मचारी आणि शेजारी धावले. पण तोपर्यंत डॉक्टराचे बरेच रक्त गेले होते आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला.
4 / 7
विशेष बाब म्हणजे डॉ.मुनेंद्र प्रताप वर्मा यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. त्या ठिकाणापासून काही अंतरावरच पोलीस पिकेट आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने हातात चाकू देखील घेतला होता.
5 / 7
या घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी पोहोचले. हल्लेखोराला गावातूनच अटक करण्यात आली आहे. या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली. एसपी आरपी सिंहही घटनास्थळी पोहोचले.
6 / 7
घटनास्थळी पोहचलेले पोलीस अधीक्षक आर.पी.सिंह यांनी हल्लेखोर अच्छे लाल विश्वकर्मा याला तलवारीसह अटक केल्याचे सांगितले. एसपीच्या मते, प्रथमदर्शनी हे जमिनीच्या पैशाच्या व्यवहारामुळे समोर आले आहे, परंतु पोलीस इतर पैलूंवरही तपास करत आहेत.
7 / 7
या घटनेच्या निमित्ताने समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर निशाणा साधला. अखिलेश यांनी ट्वीट करून म्हटले आहे की,  'सीतापुर के हरगांव क्षेत्र में एक डॉक्टर की तलवार से हत्या व उनके पिता पर क़ातिलाना हमले की दुर्दांत घटना से प्रदेश भयभीत है, घटना-स्थल से कुछ ही दूर...
टॅग्स :Policeपोलिसdoctorडॉक्टरUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटकDeathमृत्यू