शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरावर ड्रग्जप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी टाकला छापा 

By पूनम अपराज | Published: October 15, 2020 6:34 PM

1 / 6
बेंगळुरू पोलिस सर्च वॉरंटसह जुहू येथील विवेक ओबेरॉयच्या घरी पोहोचले होते.
2 / 6
एका पोलीस अधिकाऱ्याने या छापाबद्दल सांगितले की, 'आदित्य अलवा फरार आहे. विवेक ओबेरॉय हा त्याचा नातेवाईक आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, अलवा त्याच्या घरात लपला आहे. म्हणून आम्हाला तपासायचे होते. यासाठी कोर्टाकडून वॉरंट घेण्यात आले आणि आमची गुन्हे शाखेची टीम बेंगळुरुहून मुंबईत त्यांच्या घरी गेली.
3 / 6
पोलिसांनी बंगळुरूमध्ये आदित्य अलवाच्या घराची झडतीही घेतली आहे. आदित्य हा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अलवा यांचा मुलगा आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील गायक आणि कलाकारांना ड्रग्ज पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
4 / 6
कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये सॅण्डलवूड म्हणून ओळखले जाते. बॉलिवूडप्रमाणे दक्षिणेतही ड्रग्सबाबत खुलासे झाले. या हाय-फाय ड्रग्जच्या प्रकरणात बरीच मोठी नावे समोर आली होती. काही ड्रग्ज पेडलर्स देखील पकडले गेले. तसेच या प्रकरणात अभिनेत्री रागिनी द्विवेदी आणि संजना गल्रानी यांना अटक करण्यात आली होती.
5 / 6
कन्नड चित्रपट निर्माते इंद्रजित लंकेश यांनी उघडकीस आणलेल्या कथित ड्रग रॅकेटचा आदित्य अलवा हा एक मुख्य आरोपी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आपली बहीण प्रियंकाच्या घरात लपून आहे की नाही हे शोधण्यासाठी सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील विवेक ओबेरॉयच्या घराचा शोध घेण्यासाठी कोर्टाकडून वॉरंट मिळविला.
6 / 6
आदित्यची आई नंदिनी ही एक प्रतिष्ठित महिला आहे. ती एक प्रसिद्ध नर्तक आणि कार्यक्रम संयोजक आहे.१९९९ - २००४ दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एस. के. द्वारा स्थापलेल्या बेंगळुरु हब्बा (बेंगलुरू फेस्ट) च्या संस्थापक सदस्यांपैकी ती एक होती.
टॅग्स :raidधाडDrugsअमली पदार्थMumbaiमुंबईBengaluruबेंगळूरVivek oberoyaविवेक ऑबेरॉय