शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aryan Khan Drug Case: 'त्या' क्रूझवर पार्टी होणार अन् बडी मंडळी येणार! NCBला टिप कोणी दिली? अखेर नाव समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 8:45 PM

1 / 10
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर धाड टाकत काल ८ जणांना अटक केली. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्यानं बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. एनसीबीच्या कारवाईनं अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
2 / 10
आर्यन खानला आज एनसीबीनं किल्ला कोर्टात हजर केलं. त्याला ७ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आर्यनला जामीन मिळवण्यासाठी त्याचे वकील सतीश मानेशिंदेंनी त्यांचा अनुभव पणाला लावला. मात्र जामीन मिळवण्यात ते अपयशी ठरले.
3 / 10
आर्यन खानसह आठ जणांना अटक केलेल्या एनसीबीनं आज आणखी एक अटकेची कारवाई केली. क्रूझवर तब्बल १३०० ते १४०० जण होते. मात्र एनसीबीच्या अधिकाऱ्यांची नजर ८ ते १० जणांवर होती. त्यात आर्यन खान, अरबाज मर्चंट यांचा समावेश आहे.
4 / 10
गोपनीय माहितीच्या आधारे एनसीबीनं कारवाई केल्याचं सांगण्यात आलं होतं. क्रूझवर करण्यात आलेली ही कारवाई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं कोणत्याही खबरीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेली नाही. क्रूझवर रेव्ह पार्टी होणार असल्याची गुप्त माहिती सीआयएसएफनं एनसीबीला दिली होती.
5 / 10
सीआयएसएफनं रेव्ह पार्टीची माहिती दिल्यावर एनसीबीनं छापा टाकण्यासाठी पूर्ण योजना आखली. या हाय प्रोफाईलची स्क्रिप्ट महिन्याभर आधीच लिहिली गेली होती.
6 / 10
मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनसच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) आहे. सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सीआयएसएफच्या युनिटला क्रूझवरील पार्टीबद्दल एक गुप्त सूचना मिळाली होती.
7 / 10
मुंबईहून २ ऑक्टोबरला संध्याकाळी ४ वाजता निघणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझमध्ये एका इंटरटेनमेंट टीव्ही चॅनलकडून एका कार्यक्रमाचं आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सीआयएसएफकडून एनसीबीला मिळाली. ही क्रूझ ४ ऑक्टोबरला सकाळी मुंबईत परतणार होती. या क्रूझवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार होतं.
8 / 10
मुंबई-गोवा ते गोवा-मुंबई प्रवास करणाऱ्या क्रूझचं तिकीट ८० हजार रुपये होतं. ही तिकिटं ऑनलाईन विकली जात होती. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी ऑपरेशनचं नेतृत्त्व केलं. एनसीबीनं आतापर्यंत अनेकदा यशस्वी छापेमारी केली आहे. मात्र आतापर्यंत त्यांनी कधीही बोटीवर, जहाजावर छापे टाकलेले नाहीत.
9 / 10
बोटीवर तब्बल १३०० ते १४०० प्रवासी असल्यानं कारवाई कशी करायची असा प्रश्न एनसीबीसमोर होता. अधिकारी त्यांची ओळख सांगून क्रूझवर प्रवेश करू शकत नव्हते. अन्यथा सगळेच सावध झाले असते. क्रूझ रवाना होण्यापूर्वी एनसीबीचं ऑपरेशन सुरू केलं असतं, तर आरोपींना रंगेहात पकडणं कठीण होतं.
10 / 10
क्रूझचा प्रवास सुरू होताच, जहाजानं काही अंतर कापताच एवसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली. जवळपास ७ तास धाडसत्र चाललं. एनसीबीच्या टीमनं मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले. एनसीबीनं आठ जणांना अटक केली. त्यात आर्यन खानचा समावेश आहे.
टॅग्स :Aryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थ