शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ड्रग्जच्या नशेत क्रूझवरील खिडक्या तोडल्या, खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर?, तपासात नवी माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 10:01 AM

1 / 10
मुंबईत कॉर्डिलिया क्रूझवर झालेली ड्रग्ज पार्टी एनसीबीनं उधळून लावली. यात काही जणांना रंगेहात पकडण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश आहे. आर्यनला एनसीबीनं अटक केली असून त्याच्या चौकशीत काही महत्त्वाची माहिती एनसीबीला हाती लागल्याचं सांगितलं जात आहे.
2 / 10
आर्यन खानसह आणखी दोन जणांच्या पोलीस कोठडीत कोर्टानं वाढ केली आणि एनसीबीचं पथक वेगानं तपासाला लागलं आहे. एनसीबीनं आज सकाळी याप्रकरणात आणखी एकाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणातील ही अकरावी अटक आहे.
3 / 10
एनसीबीचं एक पथक कॉर्डिलिया क्रूझवर देखील पुन्हा एकदा तपासासाठी आणि पुरावे शोधण्यासाठी दाखल झालं. यात क्रूझवर अनेकांनी ड्रग्जचं सेवन केल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
4 / 10
ड्रग्जचं सेवन केल्यानंतर नशेच्या धुंदीत क्रूझच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. क्रूझवरील काही रुम्सच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या अवस्थेत आहेत.
5 / 10
त्यामुळे या क्रूझवर नेमकी काय परिस्थिती होती याचा अंदाज येतो. यासोबतच क्रूझवर आणखी काही ड्रग्ज असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
6 / 10
एनसीबीकडून केल्या जाणाऱ्या चौकशीत मोबाइल चॅट्समधून ड्रग्ज खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केला गेल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
7 / 10
मोबाइल चॅट्समध्ये काही सांकेतिक शब्दांचा वापर करण्यात आला असून क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून खरेदीबाबतचे संवाद एनसीबीच्या हाती लागल्याचं सांगितलं जात आहे.
8 / 10
आर्यन खान याच्या मोबाइलमधूनही बरीच माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे. त्यानं परदेशातही ड्रग्ज घेतल्याचं चॅट्सच्या माध्यमातून समोर आलं आहे. त्यामुळे यात आंतरराष्ट्रीय टोळीचा समावेश आहे का याबाबत एनसीबीचं पथक तपास करत आहे.
9 / 10
अरबाज मर्चंट याला घेऊन एनसीबीचे अधिकारी ठिकठिकाणी छापेमारी करण्याची दाट शक्यता आहे. अरबाजसोबतच आर्यनलाही घटनास्थळावर घेऊन जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
10 / 10
ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीच्या हाती काही आंतरराष्ट्रीय टोळीच्या संदर्भात माहिती मिळाल्यास आर्यन खान याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्टीत काही परदेशी पेडलर्सचा समावेश होता का याबाबत एनसीबीचे अधिकारी तपास घेत आहेत.
टॅग्स :Aryan Khanआर्यन खानDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो