Aryan Khan, Ananya pandey Drugs Case: आर्यनकडून अनन्या पांडेची लिंक; सुहाना खानचीही मैत्रीण, NCB च्या निशाण्यावर 'बडे मासे'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 05:07 PM2021-10-21T17:07:12+5:302021-10-21T17:15:01+5:30

Aryan Khan, Ananya Pandey and Suhana Khan's friendship: अनन्या पांडे हिच्यासोबत आर्यन खान आणि सुहाना खानचे फोटो नेहमी सोशल मीडियावर येत असतात. यामध्ये अनन्या खान कुटुंबाबरोबर किती गहरी दोस्ती आहे हे सांगत असते.

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेला (Ananya pandey) एनसीबीने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी चौकशीला बोलावले आहे. चंकीसोबत अनन्या एनसीबीच्या कार्यालयात गेली असून तिचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. अनन्या केवळ आर्यन खानचीच मैत्रीण नाही तर सुहाना खानचीही बालपणीपासूनची मैत्रीण आहे.

अनन्या पांडे हिच्यासोबत आर्यन खान (Aryan Khan) आणि सुहाना खानचे (Suhana Khan) फोटो नेहमी सोशल मीडियावर येत असतात. अनेकदा हे थ्रोबॅक फोटो अनन्याच शेअर करत असते. यामध्ये ती खान कुटुंबाबरोबर किती गहरी दोस्ती आहे हे सांगत असते. आर्यन-अनन्या यांनी एकाच शाळेत, एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे.

लॉकडाऊनमध्ये जेव्हा सुहाना मुंबईत होती, तेव्हा अनन्याने तिच्यासोबत पार्ट्या केल्या होत्या. यामध्ये शनाया, नव्या होत्या. हे फोटोदेखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. अनन्या आर्यन खानसोबत देखील अनेकदा दिसली आहे. सुहाना जेव्हा जेव्हा भारतात येते तेव्हा ती अनन्याला भेटते.

अनन्याला सुहानाचा भाऊ म्हणजेच आर्यन खानच्या व्हॉट्सअप चॅटवरून चौकशीला बोलविण्यात आले आहे. आर्यन-अनन्यामध्ये घरी ड्रग्ज असल्यावरून चॅट झाले होते. ते एनसीबीच्या हाती लागले आहेत. यामुळे एनसीबीने आज आर्यन खान आणि अनन्याच्या घरी छापा टाकला. सुहाना सध्या अमेरिकेत आहे.

अनन्या खानला बॉलिवूडमध्ये करण जोहरने (Karan Johar) एन्ट्री दिली होती. आता करण जोहरही एनसीबीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. भास्करने याचे वृत्त दिले आहे. एक वर्षापूर्वी करण जोहरच्या एका पार्टीचा व्हिडीओ (Karan Johar Party video Viral) व्हायरल झाला होता. त्यावरील तपास एनसीबीने अद्याप बंद केलेला नाही.

पुढील सहा महिन्यांत अनेक बॉलिवूडचे सेलिब्रिटी एनसीबीच्या जाळ्यात येण्याची शक्यता आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर करण जोहरच्या पार्टीचा व्हिडीओ तपासाच्या कक्षेत आहे असे सांगितले आहे.

यामध्ये रणबीर कपूर, विक्की कौशल, वरुण धवण, मलायका अरोरा, दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, शाहीद कपूर, अयान मुखर्जी दिसत आहेत. हा व्हिडीओ 28 जुलै 2019 चा असल्याचे सांगण्यात आले आहे.

करण जोहरनेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यानंतर लोकांनी हे ड्रग्ज घेत असल्याचे आरोप केले होते. यामध्ये अभिनेत्यांचे चेहरे नशेडी वाटत होते. परंतू व्हिडीओच्या प्राथमिक चौकशीत आक्षेपार्ह काही आढळलेले नाही. आता आर्यन खानच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ही फाईल बाहेर निघण्याची शक्यता आहे.