गोबऱ्या गालांचा, टपोऱ्या डोळ्यांचा! Dhanashri kadgaonkarच्या लेकाचे गोंडस फोटो पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 06:30 PM2021-10-20T18:30:00+5:302021-10-20T18:30:00+5:30

Dhanashri kadgaonkar: धनश्रीने तिच्या लाडक्या लेकाचं नाव कबीर असं ठेवलं असून आता ती तिच्या बाळाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर.

या मालिकेमध्ये धनश्रीने नंदिता म्हणजेच वहिनीसाहेब ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे तिची ही भूमिका तुफान लोकप्रिय झाली. त्यामुळेच धनश्री आज वहिनीसाहेब याच नावाने ओळखली जाते.

गेल्या काही दिवसांपासून धनश्री सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. खासकरुन तिने आई होणार असल्याची माहिती दिल्यापासून ती जास्त चर्चेत आली.

मॅटर्निटी फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या धनश्रीने २८ जानेवारी रोजी एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला.

धनश्रीने तिच्या लाडक्या लेकाचं नाव कबीर असं ठेवलं असून आता ती तिच्या बाळाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अलिकडेच धनश्रीने तिच्या पतीसोबत आणि बाळासोबत एक छान फोटोशूट केलं आहे.

धनश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने, तिच्या नवऱ्याने आणि कबीरने सारख्याच रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

कबीरचा हा गोंडस फोटो पाहून अनेकांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

धनश्रीने कबीरचे असंख्य फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यातील हा एक गोड फोटो.( फोटो सौजन्य: सर्व फोटो धनश्री काडगावकर फेसबुक/ इन्स्टाग्राम पेज)