'लागिरं झालं जी'मधील निलम काकी आठवते का?; आता करते बोल्डनेसची हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 08:00 AM2021-10-22T08:00:00+5:302021-10-22T08:00:00+5:30

Manjusha khetri: लागिरं झालं जी प्रमाणेच अनेक मालिकांमध्ये झळकलेली निलम म्हणजेच मंजुषा खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

सध्या छोट्या पडद्यावर असंख्य नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र, यामध्ये अशा काही मालिका आहेत ज्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात ठाण मांडून आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे लागिरं झालं जी.

एका सर्वसामान्य कुटुंबातून, लहानशा खेड्यातून आलेल्या तरुणाचा फौजी होण्याचा आणि त्याला साथ देणाऱ्या पत्नीचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे निलम काकी.

लागिरं झालं जी या मालिकेत शितलीच्या काकीची भूमिका साकारणारी निलम विशेष लोकप्रिय झाली.

मालिकेतील निलम ही भूमिका अभिनेत्री मंजुषा खेत्री हिने साकारली आहे.

लागिरं झालं जी प्रमाणेच अनेक मालिकांमध्ये झळकलेली निलम म्हणजेच मंजुषा खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

अनेक मालिकांमध्ये मंजुषाने साध्या, सरळ आणि सालस अशा सुनेची, बहिणीची भूमिका साकारली आहे. परंतु, प्रत्यक्षात ती अत्यंत बिंधास्त आहे.

मंजुषा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे बोल्ड फोटो ती शेअर करत असते.

मंजुषाने लागिरं झालं जी, पाहिले न मी तुला अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.