WHAT? फ्रीडा पिंटोनं वर्षभरापूर्वीच गुपचूप उरकलं लग्न, आत्ता कुठे शेअर केले लग्नाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 02:13 PM2021-10-22T14:13:47+5:302021-10-22T14:20:18+5:30

Freida Pinto wedding with Cory Tran : ‘स्लमडॉल मिलेनियर’ फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटो लवकरच बाळाला जन्म देणार आहे. लग्नाआधी आई बनणार म्हणून फ्रिडा चर्चेत आहे. पण फ्रिडाचं लग्नं कधीच झालंय.

‘स्लमडॉल मिलेनियर’ फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटो लवकरच बाळाला जन्म देणार आहे. लग्नाआधी आई बनणार म्हणून फ्रिडा चर्चेत आहे. पण फ्रिडाचं लग्नं कधीच झालंय.

होय, गेल्यावर्षीचं फ्रिडा लग्नबंधनात अडकली. मात्र आत्ता कुठे तिने याचा खुलासा केला आहे.

तिने लग्नाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फ्रिडाने गेल्या वर्षी कॅलिफॉर्नियातील होंडा सेंटर याठिकाणी अ‍ॅडव्हेंचर फोटोग्राफर कोरी ट्रॅन याच्याशी गुपचूप लग्न केलं आणि आता वर्षभरानंतर तिने लग्नाचा खुलासा केला.

होय, हे खरं आहे. एक वषार्पूर्वी आमचं लग्न पार पडलं. आम्ही ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही फक्त आमच्या आयुष्याचा आनंद घेत होतो आणि ज्यांनी विचारलं त्यांना आम्ही ही आनंदाची बातमी सांगितली,असं या पोस्टमध्ये तिनं स्पष्ट केलं आहे.

असंच एके दिवशी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. ते क्षण खूप खास होते आणि आम्ही दोघांनीही या विवाहसोहळ्याचा आनंद घेतला. आता आमच्या आयुष्यात होंडा सेंटर या जागेचं एक वेगळंच महत्त्व निर्माण झालं आहे. असं तिने पुढे लिहिलं.

कोरी आणि फ्रिडा यांच्या आयुष्यात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नुकतेच फ्रिडाने बेबी बम्पचे फोटो शेअर केले होते.

याआधी फ्रिडा देव पटेल आणि रॉनी बकाडीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.फ्रिडाचे ‘स्लमडॉग मिलिनेयर’चा अभिनेता अभिनेता देव पटेल याच्यासोबत अफेयर होते. सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ते विभक्त झाले.

यानंतर फ्रिडाच्या आयुष्यात पोलो प्लेअर रॉनी बकार्डी याची एन्ट्री झाली. पण हे नातेही फार काळ टिकले नाही. 09 / 09 फ्रिडाने ‘स्लमडॉग मिलिनेयर’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर फ्रिडाने तृष्णा, ब्लॅक गोल्ड, नाईट आॅफ कप्स, डेजर्ट डान्सर, लव सोनिया अशा अनेक चित्रपटांत काम केले.

Read in English