अमाप संपत्ती असूनही 'या' 5 अभिनेत्री राहतात भाड्याच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 06:45 PM2021-10-24T18:45:00+5:302021-10-24T18:45:00+5:30

Bollywood actress: बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या कोट्यावधींची संपत्ती कमावल्यानंतरही मुंबईत भाड्याच्या घरात राहतात.

बॉलिवूड कलाकार त्यांच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत असतात. त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलचं प्रत्येक चाहत्याला आकर्षण असतं. परंतु, बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या कोट्यावधींची संपत्ती कमावल्यानंतरही मुंबईत भाड्याच्या घरात राहतात. त्यामुळे भाड्याच्या घरात राहणाऱ्या अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात.

हुमा कुरेशी - चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावणारी हुमादेखील भाड्यानेच राहते.

हुमाने अजूनही स्वत:च घर खरेदी केलं असून ती काही वर्षानंतर तिच्या मूळ गावी पुन्हा जाणार असल्याचं म्हटलं जातं.

कतरिना कैफ - बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात कतरिना कैफ हिच्या लोकप्रियतेविषयी आणि सौंदर्याविषयी काही वेगळं सांगायची गरज नाही. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर कतरिनाने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

बॉलिवूडमध्ये नाव कमावणारी कतरिना अजूनही मुंबईत स्वत: चं घर खरेदी करु शकली नाही. कतरिना अजूनही भाड्याने राहत असून तिने अनेक घर शिफ्ट केली आहेत.

अदिती राव हैदरी- कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अदिती राव हैदरी. अनेक हिट चित्रपटांत झळकलेली अदिती एका राजेशाही कुटुंबातून आल्याचं सांगण्यात येतं.

कोट्यवधींची मालकीन असलेली अदिती मुंबईत एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते.

नर्गिस फाखरी - बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी रॉकस्टार सिनेमामुळे प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटानंतर ती अनेक सिनेमांमध्ये झळकली. परंतु, अजूनही ती भाड्याच्याच घरात राहते.

इलियाना डिक्रूझ - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेत्री इलियाना डिक्रूझ. दाक्षिणात्य चित्रपटांसोबत इलियाना बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्येही झळकली आहे.

बॉलिवूडमध्ये यश मिळवणारी इलियाना मुंबईत भाड्याच्या घरात राहते.

Read in English