'Bigg Boss'फेम रेशम टिपणीस करतीये 'या' व्यक्तीला डेट; पाहा तिच्या बॉयफ्रेंडचे Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 12:15 PM2021-10-24T12:15:41+5:302021-10-24T12:21:30+5:30

Resham tipnis: रेशमने वयाच्या २० व्या वर्षी संजीव सेठ या तिच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यासह लग्न केले. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेशम टिपणीस (resham tipnis). उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर रेशमने मराठी कलाविश्वाप्रमाणेच हिंदीमध्येही नावलौकिक मिळवला.

छोटा पडदा गाजवणारी रेशम बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) पहिल्या पर्वामुळे विशेष प्रकाशझोतात आली.

रेशमने बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व केवळ गाजवलंच नाही तर यात तिच्या आणि राजेश शृंगारपुरेच्या नावाचीही जोरदार चर्चा झाली.

बिग बॉसच्या घरात रेशम आणि राजेशचं सूत जुळल्याचं पाहण्यात आलं होतं. त्यामुळे अनेकांनी या दोघांना ट्रोल केलं होतं.

राजेशसोबतच्या नात्यात चर्चेत आलेली रेशम बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी पासूनच एका व्यक्तीला डेट करत असल्याचं सांगण्यात येतं.

रेशमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फार कमी जणांना माहित आहे. त्यामुळे रेशम कोणत्या व्यक्तीला डेट करते हा प्रश्न चाहत्यांना कायमच पडतो.

रेशम, संदेश किर्तीकरला डेट करत असल्याचं सांगण्यात येतं. संदेशसोबतचे अनेक फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

रेशम आणि संदेश गेल्या तीन-चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

संदेशदेखील रेशमप्रमाणे सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून अनेकदा तो मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींसोबतचे फोटो शेअर करत असतो.

रेशमने वयाच्या २० व्या वर्षी संजीव सेठ या तिच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यासह लग्न केले. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या ११ वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही काळानंतर ती संदेशला डेट करु लागली.

संसार मोडल्यानंतर ती एक सिंगल मदर होऊन मुलगा मानव आणि मुलगी रिशिका यांचा सांभाळ करत आहे. (फोटो सौजन्य: रेशम टिपणीस/ संदेश किर्तीकर इन्स्टाग्राम पेजः