माधुरी दीक्षितचा डाएट प्लॅन आला समोर; लंचमध्ये खाते 'हे' पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 11:18 AM2021-10-20T11:18:18+5:302021-10-20T11:23:35+5:30

Madhuri dixit: ‘अ डे इन द लाईफ ऑफ माधुरी दीक्षित’ या व्हिडीओमध्ये तिने तिचं डेलीट रुटीन सांगितलं आहे

निखळ हास्य आणि उत्तम नृत्यकौशल्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडची ही धकधक गर्ल प्रेक्षकांच्या मनावर हक्काने राज्य करत आहे. त्यामुळेच तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रत्येकाची मनं जिंकणारी माधुरी अभिनयासोबतच फिटनेसच्या बाबतीतही सजग आहे.

माधुरी तिच्या डेली रुटीनमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करते. किंवा, तिचा डाएट प्लॅन कसा आहे हे तिने नुकतंच एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे.

माधुरीने तिच्या युट्यूब पेजवर आणि इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘अ डे इन द लाईफ ऑफ माधुरी दीक्षित’ असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

‘अ डे इन द लाईफ ऑफ माधुरी दीक्षित’ या व्हिडीओमध्ये माधुरीने सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत म्हणजे दिवसभरात ती काय करते, काय खाते या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत.

माधुरी सकाळच्या नाश्त्यामध्ये चहा, ब्राऊट टोस्ट आणि अंड्याची भुर्जी खाते. या भुर्जीमध्ये ती कांदा- टोमॅटोचा वापर करत नाही. तिला सकाळी कंपल्सरी चहा लागतो.

नाश्ता झाल्यावर माधुरी तिची उर्वरित शुटींगची किंवा अन्य कामं करते. त्यानंतर दुपारचा लंच घेते.

दुपारी लंचमध्ये माधुरीला पनीरपासून तयार केलेले पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे ती बऱ्याचदा दुपारी जेवताना पालक पनीर, पनीर मखनी, फ्लॉवर घातलेला भात आणि काही उकडलेल्या भाज्या खाते.

माधुरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने तिच्या सेटवरील काही गोष्टी सुद्धा शेअर केल्या आहेत. यात ती 'डान्स दिवाने ३' सेटवर असल्याचं दिसून येतं. या सेटवर ती दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळत आहे.

Read in English