Government Jobs: नोकरी हवीय? मग हे वाचा! खूप उपयुक्त ठरेल ही माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 08:29 AM2022-06-16T08:29:28+5:302022-06-16T08:34:14+5:30

देशात सरकारी विभागांमध्ये कोणत्या विभागात किती जागा रिक्त आहेत, हे पाहू या...

येत्या दीड वर्षात १० लाख नोकऱ्या देण्याचे मिशन केंद्र सरकारने सुरू केले आहे. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाने विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांना त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्या विभागात किती जागा रिक्त आहेत, हे पाहू या.

रिक्त पदे: नागरी संरक्षण विभागात २,४७,५०२ पदे, रेल्वे विभाग- २,३७,२९५ पदे, गृह मंत्रालयात १,२८,८४२ जागा, टपाल खात्यात ९०,०५० जागा, इतर ७२ विभागांमध्ये एकूण ८७,२८६ जागा रिक्त आहेत.

अ वर्ग : २१,६१३ जागा, ब वर्ग : १७,००५ (गॅझेटेड), ब वर्ग : ८०,७५२ (नॉन गॅझेटेड), क वर्ग : ७,६७,४१४ जागा

दरवर्षी सरकारी विभागांमधील रिक्त पदांची संख्या वाढतच चालली आहे. २०१६-१७ साली ४,१२,७५२ जागा रिक्त होत्या. तर २०१५-१६ साली हिच संख्या ४,२०,५४७ इतकी होती.

४,२१,६५८ जागा २०१४-१५ साली रिक्त होत्या. २०१७-१८ मध्ये हा आकडा ६,८३,८२३ वर पोहोचला. त्यानंतर रिक्त पदांची संख्या वाढतच गेली आहे. २०१८-१९ साली ९,१०,१५३ जागा रिक्त आहेत. तर २०१९-२० पर्यंत ८,६७,३०२ पदे रिक्त आहेत.

महत्वाची बाब अशी की २०२०-२१ या काळात देशात यूपीएससी परीक्षेद्वारे केवळ ३,६०९ पदे भरण्यात आली आहेत. यूपीएससी परीक्षेद्वारे गेल्या पाच वर्षात भरण्यात आलेल्या पदांची आकडेवारी पाहुयात. २०१६-१७ साली ५,७३५, २०१७-१८ मध्ये ६,२९४, २०१८-१९ साली ४,३९९, २०१९-२० साली ५,२३० पदे भरण्यात आली आहेत.

२०२०-२१ या वर्षात देशात एसएससी स्पर्धा परीक्षेद्वारे सर्वाधिक म्हणजेच ६८,८९१ पदे भरण्यात आली आहेत. तर आरआरबी परीक्षेद्वारे ५,७६४ पदे भरण्यात आली. या वर्षात एकूण भरती ७८ हजार २६४ इतकी करण्यात आली आहे.

२०१९-२० या वर्षात सर्वाधिक भरतीची नोंद झाली. या काळात देशात स्पर्धा परीक्षेद्वारे एकूण १ लाख ४८ हजार ३७७ जागा भरण्यात आल्या होत्या. यात यूपीएससी परीक्षेतून ५ हजार २३०, एसएससी परीक्षेतून १४ हजार ६९१, तर आरआरबी परीक्षेतून एकूण १ लाख २८ हजार ४५६ जागांचा समावेश होता.