Government Job News: या आहेत भारत सरकारच्या सर्वाधिक पगार देणाऱ्या नोकऱ्या, निवड झाली तर पैसाच पैसा, जरूर करा अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 05:36 PM2022-05-05T17:36:17+5:302022-05-05T17:38:35+5:30

Government Job News: भारत सरकारच्या काही नोकऱ्या केवळ पदाच्याच नाही तर पैशांच्या हिशेबानेही उत्तम आहेत. या नोकऱ्यांमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबाबत ऐकून तुम्हीही अशी नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही.

भारत सरकारच्या काही नोकऱ्या केवळ पदाच्याच नाही तर पैशांच्या हिशेबानेही उत्तम आहेत. या नोकऱ्यांमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबाबत ऐकून तुम्हीही अशी नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही.

भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांना लोकसेवा परीक्षेच्या माध्यमातून निवडले जाते. परदेशात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर खूप मोठी जबाबदारी असते. परराष्ट्र सचिव म्हणून भारताची सेवा करणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या पगाराची सुरुवात ही ६० हजार रुपयांपासून होते.

भारतामध्ये आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचे एक वेगळेच वलय आहे. आयएएस आणि आयपीएल अधिकाऱ्यांच्या पगार ५६ हजार रुपयांपासून सुरू होतो. पॉश भागात मोठा बंगला, सरकारी गाडी, शोफर, सिक्युरिटी गार्ड्स यासह मिळणाऱ्या अनेक सुविधा तरुणांना आकर्षित करत असतात.

डिफेन्स सर्व्हिस म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये भरती झाल्यावर तुमचा सुरुवातीचा पगार ५५ हजार रुपये दरमहा एवढा असतो. तसेच तो तुमच्या प्रगतीनुसार दरमहा २.५ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. त्याशिवाय समाजामध्ये या सेवेप्रती आदर आणि सेवेत मिळणारे लाभही मोठे आहेत.

लहानपणी अनेकजण शास्त्रज्ञ किंवा इंजिनियर बनण्याचं स्वप्न बाळगून असतात. जर हे तुमचं स्वप्न साकार झालं तर तुम्हाला दरमहा ६८ हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. हा तर सुरुवातीचा पगार आहे. नियमित काळाने त्यात वाढ होत जाते.

जर तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये नशीब आजमावू इच्छित असाल तर आरबीआयची ग्रेड बी खूप चांगला पर्याय ठरू शकते. दरमहा ६५ हजार रुपयांशिवाय तुम्हाला घर, इंधन भत्ता, शिक्षण भत्ता अशा सुविधा मिळू शकतात.