Digital Marketing Jobs :कॉलेज तरुणांनो, तयारी करा...; नवे क्षेत्र खुणावतेय, 2025 पर्यंत 60-65 लाख नोकऱ्या देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 11:08 AM2022-12-13T11:08:15+5:302022-12-13T11:11:42+5:30

देशात 2008 मध्ये जेव्हा लोकांनी गुगल हे सर्च इंजिन वापरण्यास सुरुवात केली तेव्हा ती सर्व कंपन्यांसाठी गुगल जादूची कांडी ठरली.

देशाची अर्थव्यवस्था मोठी झेप घेऊ पाहत आहे. महागाई वाढलेली आहे, पाश्चात्य देशांत आर्थिक मंदीचे दिवस सुरु झाले आहेत. काही वर्षांपूर्वी ज्यांनी लाखा लाखाच्या नोकऱ्या मिळविल्या होत्या, त्यांच्यावर आता नोकरीहीन व्हायची वेळ आली आहे. अशातच दरवर्षी लाखोंच्या संख्येने कॉलेज तरुण-तरुणी बाहेर पडत आहेत. त्यांना नोकऱ्या कोण देणार हा प्रश्न आहेच. अशा फ्रेशर्ससाठी एक नवे क्षेत्र मोठी संधी घेऊन येत आहे.

इंटरनेटने १५-२० वर्षांपूर्वी सामान्यांसाठी खिडकी उघडली आणि मोठी क्रांती घडली. यानंतर डिजिटल मार्केटिंगने आपला जम बसविण्यास सुरुवात केली. सोशल मीडियाच्या अती वापरामुळे या मार्केटिंगला आता सोन्याचे दिवस य़ेऊ लागले आहेत. छोट्या छोट्या कंपन्या असोत की नेते, राजकीय पक्ष आणि संस्था सारेच आपली प्रसिद्धी करू लागले आहेत.

1986 मध्ये इंटरनेट भारतात सुरु झाले खरे परंतू त्याचा वापर मर्यादित होता. १९९५ ला ते सामान्यांसाठी सुरु करण्यात आले. 2020 पर्यंत 71 कोटी तरुणांनी इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली. आज ही संख्या 83 कोटींच्या आसपास आहे. पण देशात 2008 मध्ये जेव्हा लोकांनी गुगल हे सर्च इंजिन वापरण्यास सुरुवात केली तेव्हा ती सर्व कंपन्यांसाठी गुगल जादूची कांडी ठरली.

कंपन्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या सेवा देण्यास सुरुवात केली. ही भारतातील डिजिटल मार्केटिंगची सुरुवात होती. 2023 मध्ये, CAGR अहवालानुसार, डिजिटल मार्केट क्षेत्रात भारतीय कंपन्यांकडून 35809 कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

देशातील डिजिटल मार्केटिंग कॅप सध्या $200 बिलियनच्या जवळपास आहे. Mankinsey Global Institute (MGI) च्या अहवालानुसार, 2025 पर्यंत डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात 60-65 लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उद्योगाला कुशल लोकांची नितांत गरज आहे. जर तुम्ही 12वी, ग्रॅज्युएशन नंतर बेरोजगार असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर डिजिटल मार्केटिंग क्षेत्र तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.

ग्रॉफिक डिजाइन, कंटेंट राइटिंग, एडवांस्ड डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग मॅनेजर, सर्च इंजन ऑप्टिमाइजर, सोशल मीडिया मार्केटर, कंटेंट मार्केटर, ईमेल मार्केटर, एसईएम स्पेशालिस्ट, एआर वीआर डेवलपर, एसईओ स्पेशलिस्ट फॉर व्वाइस असिस्टेंट्स, वीडियो प्रोड्यूसर्स, ऑटोमेशन एक्सपर्ट्स, पेड मीडिया स्पेशलिस्ट, डेटा एनालिस्ट, वेब डेवलपर

टॅग्स :नोकरीjob