शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Zomato : झोमॅटो देणार ३ लाख रुपये जिंकण्याची संधी; करावं लागणार 'इतकं' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 4:29 PM

1 / 10
सध्या IPO मुळे Zomato चर्चेचा विषय ठरला आहे. लवकरच कंपनी आपला आयपीओ लाँच करणार आहे. दरम्यान, गुरूवारी कंपनीनं आपल्या बग बाऊंटी प्रोग्रॅमवरील रक्कम वाढवली आहे.
2 / 10
जर कोणत्याही व्यक्तीला Zomato या अॅपवर किंवा वेबसाईटवर बग सापडला तर त्या व्यक्तीला तब्बल ४ हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास तीन लाख रूपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.
3 / 10
झोमॅटोचा बाऊंटी बग प्रोग्रॅम हा आमच्या सुरक्षेसंदर्भातील प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग आहे. आम्हाला आशा आहे की रिवॉर्ड्स वाढवणं हॅकर्स ग्रुपला आणखी प्रेरित करेल, असं झोमॅटनं सांगितल्याचं HackerOne वरून सांगण्यात आलं आहे.
4 / 10
झोमॅटोचे सुरक्षेसंदर्भातील इंजिनिअर यश सोधा यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. तसंच याद्वारे कंपनी जिंकण्याची रक्कम वाढवत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
5 / 10
'आम्ही आता झोमॅटोच्या बाऊंटी प्रोग्रॅमसाठी पुरस्काराची रक्कम वाढवत आहोत. क्रिटीकल बग शोधणाऱ्यांना ४ हजार डॉलर्स आणि मोठा बग शोधणाऱ्यांना २ हजार आणि अन्य बग शोधणाऱ्यांना त्या प्रमाणात पुरस्काराची रक्कम दिली जाईल,' असं यश सोधा यांनी सांगितलं.
6 / 10
झोमॅटोची सुरक्षा संदर्भातील टीम वल्नरेबलिटी स्कोरिंग सिस्टमचा वापर करत नुकसानीच्या गंभीरतेचा निर्णय घेणार आहे. त्याच्याच आधारावर पुरस्काराची अंतिम रक्कम दिली जाईल.
7 / 10
धोका जितका अधिक तितकी पुरस्काराची रक्कमही अधिक असणार आहे. झोमॅटोनं हे धोके लो, मीडियम, क्रिटिकल आणि उच्च अशा भागांमध्ये विभागले आहेत.
8 / 10
CVSS 10.0 जर धोका क्रिटीकल कॅटेगरीत असेल तर युझरला ४ हजार डॉलर्स, तर दुसरीकडे CVSS 9.5 सोबत जर धोका आढळून आल्यास त्या व्यक्तीला ३ हजार डॉलर्सची रक्कम देण्यात येईल.
9 / 10
या कार्यक्रमात सामील होण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेटक अनेबल करावं लागेल. बग बाऊंटी हंटर्स जास्तकरून प्रमाणित सायबर सिक्युरिटी जाणकार किंवा रिसर्चरस असतात.
10 / 10
ते बेवला क्रॉल करतात आणि बग किंवा अन्य समस्यांसाठी सिस्टम स्कॅन करतात. याच्या माध्यमातून हॅकर्स कंपन्यांमध्ये जाऊ त्यांना ते सतर्क करू शकतात.
टॅग्स :ZomatoझोमॅटोIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगMONEYपैसाInvestmentगुंतवणूक