Zoho ची पेमेंट सर्व्हिसमध्ये एंट्री; GPay, Paytm, PhonePe ला टक्कर देण्यासाठी लॉन्च केले पेमेंट साउंड बॉक्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:51 IST
1 / 8 भारतीय टेक कंपनी झोहो (Zoho) सध्या प्रचंड चर्चेत आहे. अलीकडेच झोहोचा इंस्टंट मेसेजिंग अॅप ‘अरट्टई’ (Arattai) लोकप्रिय झाला असून, सरकारकडूनही त्याला पाठिंबा दिला जात आहे. आता कंपनीने हार्डवेअर क्षेत्रात पाऊल टाकत GPay, Paytm आणि PhonePe प्रणाणे पॉइंट ऑफ सेल (POS) डिव्हाइस विक्रीला सुरुवात केली आहे.2 / 8 झोहो पेमेंट्स अंतर्गत हे POS मशीन लॉन्च करण्यात आले आहे. या स्मार्ट डिव्हाइसमध्ये इंटिग्रेटेड QR कोड आणि साउंड बॉक्स दिला आहे. सध्या भारतात Paytm आणि PhonePe सारख्या कंपन्यांचे POS मशीन सर्वाधिक वापरले जातात, मात्र झोहोचे हे नवे उत्पादन त्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहे.3 / 8 या डिव्हाइसमध्ये टचस्क्रीन इंटरफेस आणि इनबिल्ट प्रिंटर आहे, जो त्वरित रिसीट प्रिंट करतो. याशिवाय हे मशीन 4G, Wi-Fi आणि ब्लूटूथ सपोर्ट करते. व्यापाऱ्यांना याच्या माध्यमातून UPI, QR कोड आणि चिप कार्ड्सद्वारे पेमेंट स्वीकारता येणार आहे.4 / 8 झोहोचे सीईओंनी सांगितले की, हे झोहोच्या पेमेंट बिझनेसचा विस्तार आहे. 2024 मध्ये कंपनीने सॉफ्टवेअर बेस्ड पेमेंट सोल्यूशन सुरू केले होते, पण आता त्यांनी हार्डवेअर क्षेत्रात प्रवेश केला आहे.5 / 8 झोहोच्या सिस्टीममध्ये आधीच लघु व्यवसायांसाठी अनेक मॅनेजमेंट टूल्स आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना आता एका युनिफाइड डॅशबोर्डवर रिअल टाइम पेमेंट ट्रॅकिंग आणि अकाउंट मॅनेजमेंट करता येणार आहे. तसेच या POS डिव्हाइसला PCI DSS सर्टिफिकेशन देण्यात आले आहे, ज्यामुळे ट्रान्झॅक्शन अधिक सुरक्षित राहतील6 / 8 झोहोचा ‘अरट्टई’ अॅप हळूहळू भारतीय वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. यात चॅटिंग, कॉलिंग आणि ऑनलाइन मीटिंगचे फीचर्स आहेत. सध्या अॅपमध्ये एंड-टू-एंड एनक्रिप्शन उपलब्ध नसले तरी, कंपनीने लवकरच ते देण्याचे आश्वासन दिले आहे.7 / 8 एंड-टू-एंड एनक्रिप्शनमुळे वापरकर्त्यांच्या चॅट्सना कोणीही, अगदी कंपनीही अॅक्सेस करू शकत नाही, ज्यामुळे डेटा प्रायव्हसी आणि सिक्युरिटी दोन्ही मजबूत होते. व्हॉट्सअॅपमध्ये हे फीचर आधीपासूनच आहे आणि अनेक स्वतंत्र सिक्युरिटी रिसर्चर्सनी त्याचे ऑडिट केले आहे.8 / 8 झोहो ‘अरट्टई’ अॅप आणि आता POS डिव्हाइसमुळे स्वदेशी टेक इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेने काम करत आहे. भारतात डिजिटल पेमेंट्स आणि मेसेजिंग या दोन्ही क्षेत्रांत झोहोचे हे पाऊल भविष्यात मोठा बदल घडवू शकते.