शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

YouTube: यूट्युब देतेय भरघोस कमाईची संधी, करावे लागेल केवळ हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 1:30 PM

1 / 7
जर तुम्ही सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर असाल तर तुम्हाला कमाईची सुवर्णसंधी चालून आली आहे. यूट्युबने दर्जेदार कंटेंट क्रिएटरना अधिक पैसे कमावण्याची संधी दिली आहे. इन्स्टाग्राम रील्स आणि टिकटॉकला टक्कर देण्यासाठी यूट्युब शॉर्ट्स आणले आहे. आता कंपनीने यावरील ओरिजनल कंटेंटसाठी अधिक पैसे देणार आहे.
2 / 7
यूट्युब शॉर्ट्स फंड्स जारी करण्यात आला आहे. यामध्ये १०० मिलियन डॉलर एवढा फंड क्रिएटर्सला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. १०० मिलियन डॉलर २०२१ आणि २०२२ मध्ये वितरित केले जातील. युट्युब दर महिन्याला पात्र कंटेंट क्रिएटर्सशी संपर्क साधून त्यांना ही रक्कम देणार आहे.
3 / 7
यूट्युबने याबाबत सांगितले की, क्रिएटर्सना १०० ( ७ हजार ४०० रुपये) डॉलर्स ते १० हजार डॉलरपर्यंत (७ लाख ४० हजार रुपये) कमावण्याची संधी असेल.
4 / 7
यूट्युबने सांगितले की, जे पैसे कंटेंट क्रिएटर्स शॉर्टच्या माध्यमातून कमावतील. ते व्ह्युवरशिप आणि एंगेजमेंटवर अवलंबून असतात. त्या माध्यमातून कंटेंट क्रिएटर्सना आधीच्या महिन्यातील शॉर्ट परफॉर्मन्सच्या आधारावर बोनस पेमेंट क्लेम करण्याची संधी देईल.
5 / 7
यूट्युबने सांगितले की, एका चॅनेलचा शॉर्ट्स त्यांच्या मंथली परफॉर्मन्सवर काऊंट केला जाईल. म्हणजेच दर महिन्याला त्या शॉर्चला किती लोक पाहतात यावर हे अवलंबून असेल. तसेच ज्या महिन्यामध्ये हे अपलोड केले जाईल त्यावर ही बाब अवलंबून असेल.
6 / 7
याचा अर्थ कुठलाही कंटेंट क्रिएटर कुठल्याही महिन्यात क्वालिफाय करू शकला नाही. तर त्याला पुढच्या महिन्यात क्वालिफाय करण्याची संधी असेल. या बोनसचा फायदा घेण्यासाठी कुठल्याही स्पेसिफिक परफॉर्मन्स थ्रेसहोल्डला कंपनीने मेन्शन केलेले नाही. बोनस पेमेंटसाठी लेव्हल ऑफ परफॉर्मन्स दर महिन्याला बदलू शकतो.
7 / 7
याचा अर्थ कुठलाही कंटेंट क्रिएटर कुठल्याही महिन्यात क्वालिफाय करू शकला नाही. तर त्याला पुढच्या महिन्यात क्वालिफाय करण्याची संधी असेल. या बोनसचा फायदा घेण्यासाठी कुठल्याही स्पेसिफिक परफॉर्मन्स थ्रेसहोल्डला कंपनीने मेन्शन केलेले नाही. बोनस पेमेंटसाठी लेव्हल ऑफ परफॉर्मन्स दर महिन्याला बदलू शकतो.
टॅग्स :YouTubeयु ट्यूबMONEYपैसाbusinessव्यवसाय