एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
By जयदीप दाभोळकर | Updated: November 12, 2025 09:31 IST2025-11-12T09:16:36+5:302025-11-12T09:31:17+5:30
PPF Investment Tips: जर तुम्ही अशा सरकारी योजनेच्या शोधात असाल जिथे तुम्हाला करामध्ये सूट मिळेल आणि हमी परतावादेखील मिळेल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

PPF Investment Tips: जर तुम्ही अशा सरकारी योजनेच्या शोधात असाल जिथे तुम्हाला करामध्ये सूट (Tax Exemption) मिळेल आणि हमी परतावा (Guaranteed Return) देखील मिळेल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund - PPF) तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. खरं तर, ही योजना केवळ सुरक्षित नाही, तर दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूकदारांसाठी एक मजबूत सेवानिवृत्ती निधी बनवण्याचं साधन देखील असू शकतं.

सरकार समर्थित ही योजना पूर्णपणे जोखमीपासून मुक्त आहे आणि यामध्ये तुम्हाला EEE (Exempt-Exempt-Exempt) कर लाभाचा फायदा मिळतो—म्हणजेच, गुंतवणुकीची रक्कम, त्यावर मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम तिन्ही पूर्णपणे कर-मुक्त असतात. तर आपण समजून घेऊया की पीपीएफमधून वर्षाला २.८८ लाख रुपये कसे कमावता येतात. चला, PPF चा सिक्रेट फॉर्म्युला समजून घेऊया.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खातं कोणताही भारतीय नागरिक स्वतःच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही बँकेत उघडू शकतो. इतकेच काय, अल्पवयीन मुलाच्या नावावर देखील हे खातं उघडलं जाऊ शकते, ज्याची देखरेख पालक किंवा पालकत्व स्वीकारणारे करतात.

लक्ष देण्यासारखी बाब ही आहे की, एका व्यक्तीच्या नावावर फक्त एकच PPF खातं उघडलं जाऊ शकतं. यामध्ये संयुक्त खातं उघडण्याची सोय नसते. त्यामुळे जर पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील, तर दोघेही आपापल्या नावावर वेगळी खाती उघडू शकतात. यामुळे एका कुटुंबाला दुप्पट कर लाभ आणि गुंतवणुकीचा फायदा मिळतो.

सध्या सरकार PPF वर ७.१% दरानं वार्षिक व्याज देत आहे. खरं तर, हे व्याज चक्रवाढ व्याजाच्या रूपात जमा होतं. म्हणजेच, दरवर्षी तुम्हाला तुमच्या मूळ रकमेवर व्याज मिळेल आणि नंतर त्या व्याजावरही व्याज जोडलं जाईल. ज्यामुळे तुमची रक्कम वेगानं वाढेल. PPF खात्याची कालावधी १५ वर्षांची असते, जी पुढे ५-५ वर्षांच्या कालावधीसाठी वाढवली जाऊ शकते.

गुंतवणुकीबद्दल बोलायचं झाल्यास, एक व्यक्ती दरवर्षी किमान ₹५०० आणि कमाल ₹१.५ लाख रुपयांपर्यंत जमा करू शकते. जर पती-पत्नी दोघेही वेगळी खाती उघडत असतील, तर कुटुंब मिळून दरवर्षी ₹३ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. चला, असं मानूया की तुम्ही दरवर्षी कमाल ₹१.५ लाख रुपये PPF मध्ये १५ वर्षांपर्यंत गुंतवता, तर १५ वर्षांनंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला अंदाजे ₹४०,६८,२०९ रुपये मिळतील.

खरं तर, यापैकी सुमारे ₹१८,१८,२०९ रुपये फक्त व्याजाची कमाई असेल, म्हणजेच, तुम्ही जितकी गुंतवणूक केली, त्यापेक्षा सुमारे ४५% जास्त परतावा फक्त व्याजातून मिळेल. तोही पूर्णपणे कर-मुक्त. साध्या शब्दांत सांगायचं तर, जर तुम्ही १५ वर्षांपर्यंत दरवर्षी ₹१.५ लाख सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केले आहेत, तर मॅच्युरिटीवर तुमची रक्कम ₹४०,६८,२०९ होईल.

आता जर तुम्ही ही रक्कम खात्यातच राहू दिली, तर सध्याच्या ७.१% व्याज दराप्रमाणे तुम्हाला वार्षिक सुमारे ₹२,८८,८४२ रुपये व्याज मिळेल. म्हणजेच, नवीन गुंतवणूक न करता दरवर्षी लाखांची खात्रीशीर कमाई होऊ शकते. PPF ची सर्वात खास गोष्ट ही आहे की, १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देखील तुम्ही तुमचे खातं "Extension Without Contribution" म्हणजे नवीन गुंतवणूक न करताही वाढवू शकता.

या कालावधीत तुम्हाला आधीपासून जमा असलेल्या रकमेवर सतत व्याज मिळत राहील, म्हणजेच नवीन पैसे न टाकताही तुमची रक्कम दरवर्षी वाढत राहील. उदाहरणार्थ, जर तुम्ही १५ वर्षांनंतर खातं पुढे वाढवलं आणि ₹४० लाख जमा आहेत, तर फक्त व्याजाच्या रूपात दरवर्षी सुमारे ₹२.८८ लाख पर्यंत कमावू शकता. तेही एक रुपयाचीही नवीन गुंतवणूक न करता.

PPF इतका खास का आहे? कर-मुक्त परतावा : व्याज आणि परिपक्वतेच्या रकमेवर कोणताही कर लागत नाही. हमी परतावा : सरकारद्वारे निश्चित केलेल्या व्याज दरामुळे गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. कर्जाची सोय : गरज पडल्यास खात्यातून कर्ज किंवा आंशिक पैसे काढणं शक्य आहे. सेवानिवृत्ती नियोजनासाठी उत्तम पर्याय : दीर्घ कालावधीमध्ये स्थिर आणि सुरक्षित परतावा.

















