शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बंद पडलेल्या बँक अकाउंटमधून सुद्धा पैसे काढू शकता; जाणून घ्या, नियम आणि प्रक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 12:25 PM

1 / 12
नवी दिल्ली : बँक अकाउंट बर्‍याच दिवसांपासून ऑपरेट केले नाही तर ते एक डॉरमेट अकाउंट (Dormant Account) तयार होते, म्हणजेच ते खाते निष्क्रिय केले जाते. जर तुमचे बँक अकाउंट सुद्धा असे झाले असेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही.
2 / 12
तुम्ही या बंद पडलेल्या बँक अकांउटमधून तुमचे पैसेही काढू शकता. यासाठी, तुम्हाला काही सोपी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. बँकांमध्ये अशा प्रकारच्या अकाउंटमध्ये अनक्लेम्ड पैसे सातत्याने वाढत आहेत. बँकांची अनक्लेम्ड रक्कम बचत खाते, चालू खाते, एफडी, आरडी इत्यादीमध्ये जमा करता येते.
3 / 12
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, जर एखादा ग्राहक सलग 10 वर्षे आपल्या बँक अकाउंटमध्ये कोणताही व्यवहार करत नसेल तर त्याच्या अकाउंटमध्ये जमा केलेली रक्कम अनक्लेम्ड होते.
4 / 12
बँकांमध्ये दरवर्षी अशी रक्कम वाढत आहे. वित्तीय वर्ष 2019 च्या अखेरीस बँकांमध्ये अशी एकूण रक्कम सुमारे 18,380 कोटी रुपये आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही रक्कम 14,307 कोटी होती.
5 / 12
अशी सर्व रक्कम दरमहा आरबीआयच्या डिपॉझिटरी एज्युकेशन अँड अवेयरनेस फंडाकडे वर्ग केली जाते. नियमांनुसार, प्रत्येक बँकेला आपल्या वेबसाईटवर अनक्लेम्ड रकमेचा तपशील द्यावा लागतो.
6 / 12
बँकेच्या वेबसाइटला भेट देऊन तुमच्या निष्क्रिय अकाउंटबद्दल माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्ही जन्मतारीख, नाव, पॅन नंबर, पासपोर्ट क्रमांक, पिन कोड व दूरध्वनी क्रमांक इत्यादी मदतीने शोध घेऊ शकता.
7 / 12
बँकिंग तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बँकांनी ग्राहकांना बर्‍याच सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीत लोकांना बँकिंग सेवा सुरळीतपणे मिळता येतील, यासाठी बँकांनी हे पाऊल उचलले आहे.
8 / 12
बँका आता ग्राहकांना निष्क्रिय अकाउंटला रिवाइव्ह करण्याची संधी देत ​​आहेत. यासाठी तुम्ही जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधू शकता.
9 / 12
यासाठी प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुम्हाला फक्त संबंधित बँक शाखेत एक मेल पाठवावा लागेल. या मेलमध्ये तुम्ही बँकेला विनंती कराल की, निष्क्रिय बँक अकाऊंट पुन्हा सक्रिय (रिअॅक्टिव्हेट) करावे. यासाठी तुम्हाला तुमचे ओळखपत्र, पत्ता इत्यादींचा पुरावा पाठवावा लागेल.
10 / 12
तुम्ही अर्ज पाठविल्यानंतर काही दिवसात बँक तुमचे अकाउंट पुन्हा सक्रिय करेल. मात्र, सध्या सायबर क्राइमच्या वाढत्या घटना लक्षात घेता बर्‍याच बँका रिमोटली केवायसी अपटेड करण्यास नकार देऊ शकतात.
11 / 12
अशा परिस्थितीत, ग्राहकांनी बँक शाखेत जाऊन त्यांचे निष्क्रिय अकाऊंट सक्रिय करावे, अशी बँकांची इच्छा आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या शाखेत जावे लागेल. डोअरस्टेप सेवा देखील उपलब्ध आहे.
12 / 12
डोअरस्टेप सेवेत संबंधित ऑफिशियल्स क्लांइटच्या घरी जाऊन केवायसी अपडेट करतात. एखादा अकाउंट होल्डर कोणत्याही दुसर्‍या शहरात राहत असला तरीही तो आपल्या सद्यस्थितीत जवळच्या बँक शाखेत जाऊन केवायसी अपडेट करू शकतो.
टॅग्स :bankबँकbusinessव्यवसाय