Second-Hand Smartphone : प्रत्येक १० मधून ४ स्मार्टफोन Xiaomi चे; सेकंड हँड मार्केटमध्येही Mi चं वर्चस्व कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 01:16 PM2021-06-18T13:16:31+5:302021-06-18T13:20:54+5:30

Second Hand Smartphone Cashify : २०२० या वर्षात सेकंड हँड मार्केटमध्येही २६ टक्के शाओमीच्या स्मार्टफोन्सची विक्री. शाओमीचं वर्चस्व कायम.

Second-Hand Smartphone : स्मार्टफोन, मोबाईल फोन हे आपल्या आयुष्यातील आज अविभाज्य भाग झाले आहेत. देशात स्मार्टफोनची विक्री झपाट्याने वाढली आहे आणि त्यासोबतच सेकंड-हँड स्मार्टफोनची विक्रीही वेगाने वाढली आहे.

सेकंड हँड स्मार्टफोनबद्दल सांगायचं झालं तर २०२० मध्ये सेकंड हँड मार्केटमध्ये २६ टक्के शाओमीच्या स्मार्टफोनची विक्की झाली. या प्रकारे शाओमीनं सेकंड हँड मार्केटमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे.

शाओमीनंतर Apple च्या iPhone ची सर्वाधिक विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. सेकंड हँड मार्केटमध्ये २० टक्के हिस्सा हा अॅपलचा आहे.

याचाच अर्थ १० स्मार्टफोन पैकी २ स्मार्टफोन हे अॅपलचे होते. युझ्ड स्मार्टफोन मार्केटप्लेस कॅशिफायनं (Cashify) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.

कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे घरी राहून करणाऱ्या आणि अभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे स्मार्टफोनच्या मागणीतही वाढ झाली.

याशिवाय सध्या आपल्या स्मार्टफोनला अपग्रेड (3G to 4G) करण्याची मागणी हे वेळेनुसार बदलली आहे. जेणेकरून ऑनलाईन क्लासेस आणि वर्क फ्रॉम होमसाठी अॅपचा सपोर्ट मिळायला हवा.

कॅशिफायच्या सर्वेक्षणानुसार ज्यांना नवे स्मार्टफोन विकत घेणं शक्य नाही, ते ग्राहक रिफर्बिश्ड स्मार्टफोनची मागणी वाढली आहे. या सेगमेंटमध्ये Mi चे स्मार्टफोन हे सर्वांच्या पसंतीस येत आहेत.

सेकंड हँड स्मार्टफोनमधील मार्केट शेअरबद्दल सांगायचं झालं तर २६ टक्के शेअर्ससह शाओमीचं वर्चल्व कायम आहे. तर २० टक्के शेअर्ससह अॅपल दुसऱ्या स्थानावर आहे.

१६ टक्के शेअर्ससह सॅमसंग तिसऱ्या आणि ६-६ टक्के शेअर्ससह मोटोरोला आणि विवो या कंपन्या चौथ्या स्थानावर आहेत.

सर्वेक्षणादरम्यान दिल्लीतील २३ टक्के, मुंबईतील १३ टक्के, बंगळुरूमधील ११ टक्के आणि हैदराबादमधील ७ टक्के लोकांनी सहभाग घेतला होता. गाझियाबाद, फरीदाबाद, अहमदाबाद आणि लखनौसारख्या शहरांमध्येही वाढ दिसून आहे.

सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षात लोकांनी आपल्या स्मार्टफोनची सरासरी ४,२१७ रूपयांना विक्री केली. सर्वाधिक लोकांनी आपले स्मार्टफोन तीन वर्षांपर्यंत आपल्याकडे ठेवले होते.

तीन वर्षांपर्यंत आपल्याकडे स्मार्टफोन ठेवणाऱ्या लोकांनी विकलेल्या स्मार्टफोनमध्ये ६२ टक्के स्क्रिन आणि २१ टक्के स्मार्टफोनमध्ये बॅटरीसंबंधी समस्या असल्याचं समोर आलं.

स्मार्टफोनची विक्री करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या ८० टक्के, तर महिलांची संख्या २० टक्के इतकी होती.

सर्वेक्षणादरम्यान ४ हजार ग्राहकांकडून प्रतिक्रिया विचारण्यात आली. यादरम्यान बहुतांश भारतीयांनी लॅपटॉप विकत घेण्यापेक्षा स्मार्टफोनला प्राधान्य दिल्याचं समोर आलं.

याशिवाय स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर १४-१८ महिन्यांच्या आत ८४ टक्के लोकांनी ते अपग्रेड केले. खरेदी करताना लोकांनी नो कॉस्ट ईएमआयचे पर्याय आणि रिप्लेसमेंट वॉरंटीसारख्या बाबींना प्राधान्य दिलं.