जगातील सर्वाधिक जास्त तेल उत्पादन करणारे देश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 02:21 PM2019-11-14T14:21:55+5:302019-11-14T14:30:34+5:30

सौदी अरेबियात तेल कंपनीवर ड्रोन हल्ले झाल्यामुळे तेल उत्पादन क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. येमेनमधील हौथी बंडखोरांनी हे हल्ले केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, सौदी अरेबिया जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादन करणारा देश आहे. असेच, जगातील सर्वाधिक जास्त तेल उत्पादन करणारे दहा देश आहेत. खालील प्रमाणे...

1 : अमेरिका - जागतिक तेल उत्पादनात अमेरिकेची भागिदारी 16.2 टक्के आहे.

2 : सौदी अरेबिया - जागतिक तेल उत्पादनात सौदी अरेबियाची भागिदारी 13 टक्के आहे.

3 : रशिया - जागतिक तेल उत्पादनात रशियाची भागिदारी 12.1 टक्के आहे.

4 : कॅनडा - जागतिक तेल उत्पादनात कॅनडाची भागिदारी 5.5 टक्के आहे.

5 : इराण - जागतिक तेल उत्पादनात इराणची भागिदारी 5 टक्के आहे.

6 : इराक - जागतिक तेल उत्पादनात इराकची भागिदारी 4.9 टक्के आहे.

7 : युएई - जागतिक तेल उत्पादनात युएईची भागिदारी 4.2 टक्के आहे.

8 : चीन- जागतिक तेल उत्पादनात चीनची भागिदारी 4 टक्के आहे.

9 : कुवेत - जागतिक तेल उत्पादनात कुवेतची भागिदारी 3.2 टक्के आहे.

10 : ब्राझील - जागतिक तेल उत्पादनात ब्राझीलची भागीदारी 2.8 टक्के आहे.