पुढच्याच आठवड्यात सोन्या-चांदीचा भाव आणखी घसरणार? काय म्हणतात तज्ज्ञ? हे घटक महत्वाचे ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 23:38 IST2026-02-15T23:34:11+5:302026-02-15T23:38:39+5:30
'एंजेल वन'चे प्रथमेश माल्या यांनी म्हटेल आहे की, १३ फेब्रुवारीपर्यंत १० ग्रॅम सोन्याचा दर १,८०,००० रुपयांच्या उच्चांकावरून घसरून १,५३,८०० रुपयांपर्यंत खाली आला आहे.

पुढच्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत आणखी घसरण दिसण्याची शक्यता आहे. सराफा बाजारात अस्थिरता दिसू शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेतील महागाई, जीडीपी आणि फेडरल रिझर्व्हचे धोरण यांकडे गुंतवणूकदारांचे बारकाईने लक्ष आहे.

तज्ज्ञांच्या मते, व्यापारी संभाव्य व्याजदर कपातीची वेळ आणि गती समजून घेण्यासाठी अमेरिकन कामगार डेटा, फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) बैठकीचे मिनिट्स आणि फेड अधिकाऱ्यांच्या विधानांचे लक्ष ठेवून आहेत.

जेएम फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष प्रणव मेर यांच्या मते, सोने आणि चांदीच्या किंमतीत मजबूती दिसू शकते. तथापि, आगामी यूएस GDP आणि वैयक्तिक वापर खर्च (PCE) महागाईच्या आकडेवारीवर आणि फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांच्या टिप्पण्यांवर लक्ष केंद्रित असल्याने अस्थिरता दिसू शकते.

गेल्या आठवड्यात घरगुती बाजारात (MCX) चांदीच्या दरात ५,५३२ रुपयांची (२.२ टक्के) घसरण झाली, तर सोन्याच्या दरात ४४४ रुपयांची (०.३ टक्के) किंचित वाढ नोंदवली गेली.

सोनं 1,53,800 रुपयांवर - 'एंजेल वन'चे प्रथमेश माल्या यांनी म्हटेल आहे की, १३ फेब्रुवारीपर्यंत १० ग्रॅम सोन्याचा दर १,८०,००० रुपयांच्या उच्चांकावरून घसरून १,५३,८०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. अमेरिकेतील मजबूत रोजगार आकडेवारीमुळे तूर्तास व्याजदर कपातीची शक्यता धूसर झाल्याचा परिणाम किमतींवर झाला आहे.

काय म्हणतात टाइटन कंपनीचे एमडी - टाइटन कंपनीचे एमडी अजय चावला यांनी म्हटले आहे की, सोन्याच्या दरातील अस्थिरतेचा भारतीय ग्राहकांवर फारसा नकारात्मक परिणाम दिसत नाही. आता ते शेअर बाजारातील गुंतवणुप्रमाणेच, या किमतीत घसरणीकडे संधी माणून बाजारात प्रवेश करत आहेत. पूर्वी ग्राहक महागड्या दरामुळे खरेदी टाळण्यास विलंंब करत होते. मात्र, आता दर कमी होताच गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे.

















