SBI-HDFC Bank मध्ये कोणाचं Home Loan आहे स्वस्त? ₹७० लाखांच्या लोनसाठी किमान किती असावी सॅलरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 08:55 IST2026-01-30T08:38:22+5:302026-01-30T08:55:32+5:30
SBI-HDFC Bank Home Loan: घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताना सर्वात मोठा प्रश्न हा असतो की होम लोन कुठून घ्यावं? सरकारी क्षेत्रातील एसबीआय (SBI) आणि खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी (HDFC Bank) हे दोन्ही विश्वासाचे पर्याय मानले जातात.

SBI-HDFC Bank Home Loan: घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताना सर्वात मोठा प्रश्न हा असतो की होम लोन कुठून घ्यावं? सरकारी क्षेत्रातील एसबीआय (SBI) आणि खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी (HDFC Bank) हे दोन्ही विश्वासाचे पर्याय मानले जातात.

मात्र, व्याजाचा दर, ईएमआय आणि पगाराच्या अटींमध्ये फरक असू शकतो. जर तुम्ही ७० लाख रुपयांचं गृहकर्ज २० वर्षांसाठी घेण्याचा विचार करत असाल, तर कोणत्या बँकेचा पर्याय अधिक किफायतशीर आहे आणि त्यासाठी किमान पगार किती हवा, याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पाहूया यासंदर्भातील अधिक माहिती.

भारतीय स्टेट बँक सध्या ७.२५% या सुरुवातीच्या व्याजदरानं होम लोन उपलब्ध करून देत आहे. ही सर्वात स्वस्त व्याजदराची ऑफर प्रामुख्याने ८०० किंवा त्यापेक्षा जास्त सिबिल (CIBIL) स्कोर असलेल्या ग्राहकांसाठी असते.

७० लाख रुपयांचं कर्ज मिळवण्यासाठी बँकेच्या निकषांनुसार तुमचा किमान मासिक पगार ८३,३४० रुपये असणं आवश्यक आहे. या आधारावर तुम्हाला एकूण ७३.८१ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं आणि तुमचा मासिक ईएमआय ५८,३३८ रुपये असेल.

एचडीएफसी बँक - खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक सध्या ७.९०% या सुरुवातीच्या व्याजदरानं होम लोनची ऑफर देत आहे. या व्याजदरानुसार, जर तुम्हाला २० वर्षांसाठी ७० लाख रुपयांचे कर्ज घ्यायचे असेल, तर तुमचा किमान मासिक पगार १,०६,००० रुपये असणं गरजेचं आहे.

या गणनेनुसार तुम्हाला ७०,२२,१७४ रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते आणि त्याचा मासिक ईएमआय ५८,३०० रुपये इतका असेल. तुमची कर्ज घेण्याची पात्रता ही तुमचे उत्पन्न, वय, आर्थिक स्थिती आणि क्रेडिट हिस्ट्री यावर अवलंबून असते.

दोन्ही बँकांच्या व्याजदराची तुलना केली असता, एसबीआयचे होम लोन अधिक स्वस्त असल्याचं दिसून येतं. एसबीआयमध्ये किमान पगाराची अट देखील एचडीएफसी बँकेच्या तुलनेत शिथिल आहे. म्हणजेच, एचडीएफसी बँकेच्या तुलनेत एसबीआयमध्ये कमी पगार असतानाही तुम्हाला तुमच्या गरजेनुसार होम लोन मिळणं सोपं जाऊ शकते.

















