कोण आहेत ऋषी पारती, काय करतात बिझनेस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 15:39 IST2024-12-07T15:33:02+5:302024-12-07T15:39:46+5:30

गुरुग्राममधील एका उद्योजकाने तब्बल १९० कोटींचा फ्लॅट खरेदी केला आहे. या उद्योजकाचे नाव आहे, ऋषी पारती.

हरयाणातील गुरुग्राम महागड्या घरांच्या बाबतीत मुंबई, बंगळुरुला टक्कर देऊ लागले आहे. उद्योजक ऋषी पारती यांनी तब्बल १९० कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला. या खरेदीची जोरदार चर्चा होत आहे.

डीएलएफच्या गोल्फ कोर्स रोडवरील द कॅमेलियाज नावाच्या अलिशान प्रोजेक्टमध्ये हा फ्लॅट असून, तो १६ हजार चौरस फूटांचा आहे.

ऋषी पारती हे इन्फो-एक्स सॉफ्टवेअर प्रा.लि. या सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. या फ्लॅटची रजिस्ट्री मागील आठवड्यात झाली. देशातील सर्वात महागड्या फ्लॅटपैकी हा एक व्यवहार ठरला आहे.

ऋषी पारती हे चार कंपन्यांचे संचालक आहेत. यात इन्फो एक्स सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीसह फाईंड माय स्टे प्रायव्हेट, इंटीग्रेटर व्हेन्चर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचाही समावेश आहे.

ऋषी पारती यांची कंपनी लॉजिस्टिक्स क्षेत्राशी संबंधित आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटनुसार, इन्फो एक्स सॉफ्टवेअरची स्थापना २००१ मध्ये झाली होती. कंपनी एनव्हीओसीसी, फ्रंट फॉरवर्डर्स, शिप आणि कॅरिअर्स यांना ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिस पुरवते.

ऋषी पारती यांनी वयाच्या २४ व्या वर्षी इन्फो एक्स कंपनी सुरू केली होती. त्यांनी तीन लोकांना सोबत घेत ही कंपनी सुरू केली होती.

ऋषी पारती यांची इन्फो एक्स सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड ही कपंनी तब्बल १५ देशांमध्ये सेवा पुरवते.