निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 14:05 IST2025-09-08T13:56:22+5:302025-09-08T14:05:58+5:30

तुमच्या निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे.

अनेकदा काही चुकांमुळे किंवा चुकीच्या गुंतवणुकीमुळे निवृत्तीनंतर अडचणी येऊ शकतात. म्हणूनच, खालील चुका टाळणे आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.

रक्कम काढण्याचा ठोस आराखडा नसल्यास तुमची बचत लवकर संपण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर पैसे अडकणे, कमी परतावा आणि लवचिकतेच्या अभावामुळे ॲन्युइटी योजना त्रासदायक ठरतात.

सुरक्षित गुंतवणुकीपायी इक्विटीपासून पूर्णपणे दूर राहिल्यास महागाईचा फटका बसू शकतो. आरोग्य विमा नसल्यास रुग्णालयात एकदा दाखल झाले तरी संपूर्ण बचत संपू शकते. इच्छापत्र किंवा नॉमिनेशन न केल्यास वारसांत वाद उद्भवून नुकसान होऊ शकते.

डेट म्युच्युअल फंड्स: फायदे : अल्पावधीसाठी उत्तम, सिस्टीमॅटिक ट्रान्सफर प्लॅन आणि सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅनसाठी योग्य. तोटे : व्याजदर, पत आणि तरलतेचा धोका. (मार्केट रिटर्न्स १ टक्के)

बॅलन्स्ड/ हायब्रिड फंड्स : फायदे : इक्विटी आणि कर्ज यांचा मिलाफ, चांगला परतावा. तोटे : बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून. तरुण वयात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. (मार्केट रिटर्न्स १ टक्के)

इक्विटी म्युच्युअल फंड्स : फायदे : महागाईवर मात करण्याएवढी वाढ, गरजेनुसार पैसे काढण्याची सोय. तोटे : बाजाराचा धोका, योग्य शिस्त, मालमत्ता वाटपाची गरज. (मार्केट रिटर्न्स १ टक्के)

नॅशनल पेन्शन स्किम: फायदे : गुंतवणुकीचे विविधीकरण, कमी खर्च. तोटे : पेन्शनमध्ये रूपांतरण अनिवार्य, पैसे काढण्यावर मर्यादा, परताव्याची हमी नाही, जुन्या कर प्रणालीत सूट. (मार्केट रिटर्न्स १ टक्के)

वरिष्ठ नागरिक बचत योजना: फायदे : सरकारी पाठिंबा. तोटे : व्याजावर कर लागतो, गुंतवणुकीची मर्यादा ३० लाख रुपये, जुन्या कर प्रणाली अंतर्गतच कर सवलत. (परतावा ८.२ टक्के)

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड: फायदे : EEE दर्जा, सरकारी पाठिंबा, चक्रवाढचा फायदा. तोटे : १५ वर्षांचा लॉक-इन कालावधी, कमी तरलता, पैसे काढण्यावर मर्यादा. (परतावा ७.१ टक्के)

पीएम वय वंदना योजना : फायदे : सरकारी योजना, पेन्शनसारखे निश्चित परतावे. तोटे : महागाईनुसार समायोजन नाही, गुंतवणुकीची कमी मर्यादा. (परतावा ७.४ टक्के)

टॅक्स फ्री बाँड्स : फायदे : AAA-रेटिंग, सुरक्षित, निश्चित परतावा, जास्त कर दराच्या सेवानिवृत्तांसाठी उत्कृष्ट. तोटे : महागाईवर मात करण्यास अडचणीचे. (परतावा ५.५ ते ६ टक्के)

फिक्स्ड डिपॉझिट (एफडी): फायदे : सोपी, परिचित, निश्चित परतावा. तोटे : खूप जास्त कर लागतो, महागाईमुळे पैशाचे मूल्य कमी होते. (परतावा ६-७ टक्के)

इमेजिएट/ लाइफ ॲन्युइटीज: फायदे : आयुष्यभर उत्पन्नाची हमी, अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त. तोटे : लवचिक नाही, महागाईपासून संरक्षण नाही, भांडवल अडकते. (परतावा ५-६ टक्के)

ट्रॅडिशन एंडोवमेंट / इन्शुरन्स प्लॅन: फायदे : संरक्षण आणि बचत यांचा योग्य मिलाफ. तोटे : कमी परतावा, कमी तरलता, सेवानिवृत्तीसाठी योग्य नाही. (परतावा ४-५ टक्के) (परतावा, नफा किंवा तोटा शेअर बाजार आणि कर्जबाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असतो.)

सूचना -यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.