Income Tax: तुमचे पैसे गेले कुठे? एका क्लिकवर कळणार; आयकर विभागाचे हे फिचर करेल मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 11:01 AM2021-11-05T11:01:07+5:302021-11-05T11:06:55+5:30

Income Tax annual information statement: आता इन्कम टॅक्सने ॲन्युअल इन्फर्मेशन स्टेटमेंट (एआयएस) ही एक नवी प्रणाली आणली आहे. यातून तुम्हाला तुमच्या वार्षिक आर्थिक व्यवहारांची माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे.

प्राप्तिकर परतावा अर्थात आयटी रिटर्न भरण्याची तारीख आता जवळ येऊ लागली आहे. मात्र, आयटी रिटर्न भरणे पूर्वीसारखे फारसे जिकिरीचे राहिलेले नाही. इन्कम टॅक्सच्या संकेतस्थळावरही पर्याय उपलब्ध आहेत.

आता इन्कम टॅक्सने ॲन्युअल इन्फर्मेशन स्टेटमेंट (एआयएस) ही एक नवी प्रणाली आणली आहे. यातून तुम्हाला तुमच्या वार्षिक आर्थिक व्यवहारांची माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे.

याआधी इन्कम टॅक्स २६ एएस विवरण देत असे. त्यामानाने एआयएस खूपच तपशीलवार आहे. वर्षभरात तुम्हाला सेव्हिंग्जवर मिळालेले व्याज, म्युच्युअल फंड व्यवहार इत्यादी सर्व माहिती एआयएसवर उपलब्ध असते.

https://t.co/WtESV72dHq या ठिकाणी लॉग इन करा.nतेथून सर्व्हिस टॅबवर जा. या टॅबच्या अखेरीस एआयएस पर्याय असतो. त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन टॅब सुरू होतो.

त्यावर दोन पर्याय असतात - डाव्या बाजूला टॅक्स इन्फर्मेशन सिस्टीम आणि उजव्या बाजूला एआयएस असे असेल. एआयएसवर आर्थिक व्यवहारांची माहिती तपशीलवार उपलब्ध असते. पीडीएफ डाऊनलोड करता येऊ शकते. पॅन क्रमांक आणि जन्मतारीख हे त्याचे पासवर्ड असतात.

नाही. तुम्हाला २६ एएस आणि एआयएस दोन्ही प्राप्त होतील. दोन्ही एकत्र केल्यास इन्कम टॅक्स खात्याला तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती प्राप्त होते. आयटी रिटर्न भरण्यासाठी हे अर्थातच सोयीचे ठरते. कारण तुमच्या आर्थिक व्यवहारांची तपशीलवार माहिती इन्कम टॅक्स खात्याला असते.

सेव्हिंग्ज अकाऊंटवर मिळालेले व्याज व वेतन किंवा उत्पन्न. म्युच्युअल फंड व्यवहार. काही लाभांश मिळाले असल्यास.