शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...म्हणून अब्जाधीश वॉरेन बफे कायम 'कॅश पेमेंट'च करतात, कार्ड वापरतच नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 6:44 PM

1 / 12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता नोटाबंदीची 'ऐतिहासिक' घोषणा केली होती. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या होत्या. त्यानंतर, 'कॅशलेस' इकॉनॉमी किंवा 'लेस कॅश' इकॉनॉमीची जोरदार चर्चा झाली होती.
2 / 12
नोटाबंदीच्या निर्णयातून किती काळा पैसा बाहेर आला, हा वादाचा विषय आहे; पण गुगल पे, फोन पे, अमेझॉन पे अशी अनेक ई-वॉलेट्स या घोषणेनंतर उदयाला आली आणि आज त्यांनी हजारो मोबाईलमध्ये हक्काचं स्थान मिळवलंय.
3 / 12
क्रेडिट कार्डचा वापर आजही विशिष्ट वर्गापुरता मर्यादित असला, तरी 'लेस कॅश' इकॉनॉमीचे वारे वाहिल्यानंतर, डेबिट कार्ड वापरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
4 / 12
हॉटेल्स, सुपर मार्केट्सपासून अगदी जनरल स्टोअर्सपर्यंत सगळीकडे आपल्याला स्वाईप-मशीन दिसतात आणि ग्राहक मंडळी - म्हणजे आपण सगळेच नोटांऐवजी कार्डच पुढे करतो.
5 / 12
अशा या प्लास्टिक मनी किंवा ई-वॉलेट्सच्या काळात, जगातील एक अब्जाधीश उद्योगपती असलेले वॉरेन बफे कार्ड पेमेंटऐवजी कॅश पेमेंटच करतात, असं सांगितलं तर अनेकांचा विश्वास बसणार नाही.
6 / 12
वॉरेट बफे हे ८८ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे धनी असून, जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमाकांवर आहेत.
7 / 12
कार्ड पेमेंट नावाचा काही प्रकार आहे, हे आपल्याकडे जेव्हा ठाऊकही नव्हतं तेव्हापासून - म्हणजेच १९६४ पासून वॉरेन बफे यांच्याकडे 'चार्ज कार्ड' (आजचं क्रेडिट कार्ड)आहे. अमेरिकन एक्सप्रेसनं ते त्यांना दिलं होतं.
8 / 12
मात्र, आजही ९८ टक्के पेमेंट्स किंवा बिलं आपण रोख रक्कम देऊन करतो, असं खुद्द बफे यांनी 'याहू फायनान्स'ला सांगितलं होतं.
9 / 12
साधारण ४०० डॉलर्स ते कायम सोबत ठेवतात. म्हणजे, कुठेही पैसे देण्याची वेळ पडल्यास कार्ड काढावंच लागत नाही.
10 / 12
का बरं असं असेल? वॉरेन बफेंना कार्ड पेमेंट सुरक्षित वाटत नाही का?, की 'लेट फी' आणि तत्सम प्रकार नकोत म्हणून ते कार्ड पेमेंट टाळतात?, असे प्रश्न कुणालाही पडणं स्वाभाविक आहे.
11 / 12
पण, वॉरेन बफेंचं उत्तर अगदी साधं-सरळ आहे. ते वाचून, आपले आई-बाबा आणि आजी-आजोबा आजही कॅश पेमेंटलाच पसंती का देतात, हेही तुम्हाला कळेल.
12 / 12
''कॅश पेमेंट' करणं हे अगदी सोपं आणि सोयीचं पडतं', असं वॉरेन बफेंचं म्हणणं आहे आणि ते सगळ्यांनाच पटणारंही आहे. अर्थात, अशी माणसं हळूहळू कमी होत चालली आहेत. येत्या काळात ऑनलाइन बँकिंग, ई-पेमेंट्स वाढत जातील, हे वास्तव आहे. पण, 'जुनं ते सोनं' या उक्तीनुसार 'रोकडा व्यवहारा'ची सर कशालाच येणार नाही!
टॅग्स :Note BanनोटाबंदीInvestmentगुंतवणूकMONEYपैसा