एका दिवसात UPIवरून किती रुपये पाठवू शकतात SBIसह इतर बँकांचे ग्राहक? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 03:05 PM2022-06-13T15:05:58+5:302022-06-13T15:10:41+5:30

UPI Transaction Limit: यूपीआय आज सर्वात वेगवान आणि सर्वात सोप्या पद्धतीने पैसे भरणा करण्याची पद्धत बनली आहे. मात्र याच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांसाठी एक मर्यादा आहे. ही मर्यादा तुमच्या बँकेवर अवलंबून आहे. आज आम्ही तुम्हाला काही मोठ्या बँकांच्या यूपीआय ट्रान्झॅक्शन लिमिटबाबत सांगणार आहोत.

यूपीआय आज सर्वात वेगवान आणि सर्वात सोप्या पद्धतीने पैसे भरणा करण्याची पद्धत बनली आहे. मात्र याच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांसाठी एक मर्यादा आहे. ही मर्यादा तुमच्या बँकेवर अवलंबून आहे. आज आम्ही तुम्हाला काही मोठ्या बँकांच्या यूपीआय ट्रान्झॅक्शन लिमिटबाबत सांगणार आहोत.

भारतालील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या यूपीआय ट्रान्झॅक्शनची मर्यादा १ लाख रुपये एवढी आहे. त्याशिवाय त्याच्या दैनंदिन व्यवहाराची मर्यादाही १ लाख रुपये एवढी आहे.

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने यूपीआय ट्रान्झॅक्शन आणि डेली लिमिट १ लाख रुपये एवढी मर्यादित केली आहे. मात्र नवीन ग्राहक पहिल्या २४ तासांमध्ये केवळ ५ हजार रुपये एवढंच ट्रान्झॅक्शन करू शकतो.

याचीसुद्धा यूपीआय ट्रान्झॅक्शन लिमिट आणि डेली लिमिट १ लाख रुपये एवढी मर्यादित करण्यात आली आहे.

याची ट्रान्झॅक्शन लिमीट २५ हजार रुपये आहे. तर डेली यूपीआय लिमिट ५० हजार रुपयांपर्यंत आहे.

अॅक्सिस बँकेच्या यूपीआय ट्रान्झॅक्शन लिमिट आणि डेली लिमीट १ लाख रुपये आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या यूपीआय ट्रान्झॅक्शनची लिमिट आणि डेली लिमिट १० हजार रुपये आहे. मात्र गुगल पे युझर्ससाठी या दोघांचीही लिमिट २५ हजार रुपये आहेत.