शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

UIDAI नं व्हेरिफिकेशन चार्ज २० रूपयांवरून केला ३ रूपये; ९९ कोटी e-KYC साठी Aadhaar चा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:58 AM

1 / 8
भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) ने ग्राहकांच्या आधार पडताळणीची रक्कम २० रुपयांवरून ३ रुपये केली आहे. विविध सेवा आणि फायद्यांद्वारे लोकांचे जीवन सुलभ करण्यासाठी त्यामच्या पायाभूत सुविधांचा लाभ घेतला जातो हे सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
2 / 8
एनपीसीआय-आयएएमए (NPCI-IAMA) आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित करताना यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सौरभ गर्ग म्हणाले की, फिनटेक क्षेत्रात आधारचा लाभ घेण्याची प्रचंड क्षमता आहे.
3 / 8
आम्ही प्रति पडताळणीचा दर २० रुपयांवरून ३ रुपये केला आहे. विविध एजन्सी आणि संस्था सरकारने तयार केलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांचा उत्तम वापर करावा. तसंच लोकांचं जीवन सुलभ करण्यासाठी या पायाभूत सुविधेचा वापर करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
4 / 8
आतापर्यंत ९९ कोटी e-KYC साठी आधार प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. UIDAI कोणासोबतही बायोमॅट्रिक्स शेअर करत नाही.तसंच अन्य भागीदारांसहदेखी अशाच प्रकारची गोपनीयता बाळगली जावी अशी अपेक्षाही करण्यात येत आहे.
5 / 8
दरम्यान, नवं आधार कार्ड तयार करण्यासाठी ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. परंतु आधार कार्ड अपडेट करणं म्हणजेच, नाव, पत्ता, जन्म तारीख ईमेल यांत बदल करण्यासाठी शुल्क आकारलं जातं. डेमोग्राफिक अपडेटसाठी ५० रूपये आणि बायोमॅट्रिक अपडेटसाठी १०० रूपये शुल्क घेण्यात येतं.
6 / 8
नरेंद्र मोदी सरकारने सर्व योजनांना आधारशी जोडले आहे. ५४ मंत्रालयाच्या सुमारे ३११ केंद्रीय कल्याण योजना आधार वापरून थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्लॅटफॉर्म अंतर्गत येतात.
7 / 8
शेतकऱ्यांसाठी पीएम-किसान निधी योजना आधार प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, ज्यामध्ये सुमारे १० कोटी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २ हजार रुपये हस्तांतरित केले जात आहेत.
8 / 8
याशिवाय, पीएम उज्ज्वला योजना आणि पीएम गरीब कल्याण योजना, ज्यामध्ये गरीबांना मोफत अन्नधान्य वाटप केले जात आहे. आधार प्लॅटफॉर्मचा वापर येथेही केला जात आहे. आधार पडताळणी म्हणजे योजनेचा लाभार्थी योग्यरित्या ओळखण्यासाठी आधार क्रमांक वापरला जात आहे.
टॅग्स :businessव्यवसायAdhar Cardआधार कार्डprime ministerपंतप्रधानIndiaभारत