टेलिकॉम कंपन्यांना TRAI चा दणका; आता Jio, Airtel, Vi ने लॉन्च केले स्वस्त रिचार्ज प्लॅन्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:26 IST2025-02-04T15:07:46+5:302025-02-04T15:26:44+5:30
TRAI Order to Telecom Companies : देशातील कोट्यवधी मोबाइल यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन TRAI ने कंपन्यांना आदेश जारी केले होते.

TRAI Order to Telecom Companies : देशातील कोट्यवधी मोबाइल यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन भारतीय दूरसंचार नियामक TRAI ने एक परिपत्रक जारी केले होते. यानुसार, सर्व दूरसंचार कंपन्यांना स्वस्त रिचार्ज प्लॅन्स सुरू करणे अनिवार्य करण्यात आले होते.
TRAI च्या आदेशानंतर, Jio, Airtel आणि Vi ने नवीन रिचार्ज प्लॅन्स लॉन्च केले आहेत. यामध्ये फक्त कॉलिंग आणि एसएमएस शुल्क घेतले गेले आहे. हे प्लॅन्स अनेक यूजर्ससाठी उपयुक्त आहेत.
Jio, Airtel आणि Vi ने प्रत्येकी फक्त दोन रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. यांची वैधता 84 दिवस आणि 1 वर्ष आहे. इतर स्मार्टफोन रिचार्जच्या तुलनेत त्यांची किंमतही कमी आहे.
Jio चे नवीन रिचार्ज प्लॅन्स- ट्रायच्या आदेशानंतर जिओने दोन नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. यासाठी जिओने व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये व्हॉइस ओन्ली प्लॅन्सची नवीन श्रेणी तयार केली आहे, ज्यामध्ये दोन रिचार्ज सूचीबद्ध केले आहेत.
Jio च्या या दोन रिचार्ज प्लॅन्सची किंमत अनुक्रमे 448 रुपये आणि 1748 रुपये आहे. यूजर्सना 448 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते, तर 1748 रुपयांच्या प्लॅनमध्ये 336 दिवसांची वैधता मिळते.
अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ- जिओच्या या दोन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. पण, 448 रुपयांमध्ये 1000 एसएमएस आणि 1748 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 3600 एसएमएसची सुविधा मिळते. या दोन्ही प्लॅन्समध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Cloud चा अॅक्सेस मिळतो.
Airtel चे नवीन रिचार्ज प्लॅन्स- Jio प्रमाणे, Airtel ने TRAI च्या आदेशानंतर दोन नवीन रिचार्ज सादर केले. 1849 रुपयांच्या रिचार्जमध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे, तर 469 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते.
एअरटेल रिचार्जचे फायदे- एअरटेलच्या या दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. पण, 469 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 900 एसएमएस, तर 1849 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3600 एसएमएस मिळतात.
Vi चे नवीन रिचार्ज प्लॅन्स- Jio आणि Airtel प्रमाणे, VI ने TRAI द्वारे अनिवार्य केलेल्या दोन नवीन रिचार्ज योजना सादर केल्या आहेत. हे प्लॅन 470 रुपये (84 दिवसांची वैधता) आणि 1849 रुपये (365 दिवसांची वैधता) आहेत.
Vi च्या दोन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो, ज्यामध्ये स्थानिक आणि STD कॉलचा समावेश आहे. 84 दिवसांच्या रिचार्जमध्ये 900 एसएमएस, तर वार्षिक रिचार्ज प्लॅनमध्ये 3600 एसएमएस उपलब्ध आहेत.