जगातील टॉप १० श्रीमंत देशांची यादी प्रसिद्ध; टॉपला कोण? भारताचा नंबर कितवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:15 IST2025-02-25T15:09:36+5:302025-02-25T15:15:52+5:30

Top 10 Richest Countries In The World: जागतिक बँकेने जगातील १० श्रीमंत देशाची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भारताचा नंबर कितवा आहे?

महाशक्ती होण्यासाठी देशाची आर्थिक स्थिती मजबूत असणे आवश्यक आहे. जागतिक बँकेने नुकतेच जगातील श्रीमंत देशाची यादी प्रसिद्ध केली आहे. जागतिक बँकेने दरडोई जीडीपीच्या आधारे ही आकडेवारी जाहीर केली आहे. दरडोई जीडीपी देशाचा आर्थिक विकास किती वेगाने होत आहे हे दर्शवितो.

जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या टॉप १० श्रीमंत देशांमध्ये तुम्हाला अशी काही नावे दिसतील ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. या यादीत भारत कितव्या स्थानी आहे?

सिंगापूर १४१,५५३ डॉलरच्या जीडीपीसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर १३९,१०६ डॉलरच्या जीडीपीसह लक्झेंबर्ग दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत कतार १२८,९१९ डॉलरसह तिसऱ्या स्थानावर आहे. आयर्लंड चौथ्या स्थानावर असून त्यांचा जीडीपी १२४,५७८ डॉलर आहे. या यादीत मकाऊ देशाचाही समावेश आहे. मकाऊ ११६,४९१ डॉलरच्या जीडीपीसह पाचव्या स्थानावर आहे.

नॉर्वेचा जीडीपी १००,६६८ डॉलर असून या यादीत नॉर्वे सहाव्या स्थानावर आहे. बिझनेस हब म्हणून पाहिल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडचा जीडीपी ८९,३१५ डॉलरवर आहे, ज्यासह ते ७ व्या स्थानावर आहे.

दक्षिणपूर्व आशियातील ब्रुनेई देशाचा जीडीपी ८५,२६८ डॉलर आहे. यासह, जागतिक बँकेच्या या यादीत हा देश ८व्या क्रमांकावर आहे. या यादीत अमेरिका ९व्या स्थानावर आहे. अमेरिकेचा जीडीपी ८२,७६९ डॉलरवर आहे. आईसलँड ७६,१५९ डॉलरच्या जीडीपीसह १०व्या स्थानावर आहे.

या यादीत भारत १२२ व्या स्थानावर असून देशाचा दरडोई जीडीपी १०,१६६ डॉलर आहे. भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तरीही देशाचा नंबर खाली असण्यचं कारण लोकसंख्येत आहे.

भारताचा जीडीपी अलीकडच्या काळात वाढला असला तरी वैयक्तिक संपत्तीच्या बाबतीत तो अनेक लहान देशांच्या मागे आहे.