जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 13:52 IST2025-04-30T13:02:26+5:302025-04-30T13:52:29+5:30
Most Expensive Cities : जगातील सर्वात महागड्या शहरांची क्रमवारी नियमितपणे बदलत असते. विविध निकष वापरुन जगभरातील शेकडो शहरांतून ही यादी प्रसिद्ध केली जाते. (उदा. राहण्याचा खर्च, वस्तू आणि सेवांची किंमत). यात काही नावे तुम्हाला परिचित असून काही नवीन वाटू शकतात. आश्चर्य म्हणजे यात भारतातील एकाही शहराचा समावेश नाही.

हाँगकाँग : अनेक वर्षांपासून हे शहर राहणीमानासाठी जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक मानले जाते. येथे घरांच्या किमती खूप जास्त आहेत.
सिंगापूर : सिंगापूर देखील उच्च राहणीमान खर्च आणि वस्तू व सेवांच्या किंमतीसाठी ओळखले जाते.
झुरिच : स्वित्झर्लंडमधील नदाकाठी वसलेले हे शहर आपल्या श्रीमंतीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे राहणे आणि फिरणे देखील प्रचंड महाग आहे.
जिनिव्हा : झुरिचप्रमाणेच जिनिव्हामध्येही राहण्याचा आणि इतर खर्च खूप जास्त आहे. जगभरातून पर्यटक इथं फिरायला येतात.
न्यूयॉर्क शहर : अमेरिकेतील हे सर्वात मोठे शहर जगातील महागड्या शहरांपैकी एक आहे. समुद्रकिनारी वसलेले हे शहर अमेरिकेचे मुख्य व्यापारी केंद्र मानले जाते.
लंडन : लंडन शहर पारंपरीक आणि आधुनिक जीवनशैलीसाठी ओळखले जाते. लंडनमध्ये घरांच्या किमती आणि वाहतूक खर्च खूप जास्त आहेत.
टोकियो : जपानची राजधानी टोकियो देखील महागड्या शहरांच्या यादीत नेहमी असते. इथं तुम्हाला मुंबईसारखी प्रचंड गर्दी पाहायला मिळेल.
कोपेनहेगन : डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन उच्च जीवनशैली खर्चासाठी ओळखली जाते.
तेल अवीव : हे शहर जगातील पहिली स्मार्ट सिटी मानली जाते. इस्रायलमधील हे शहर राहणीमानासाठी देखील महागडे मानले जाते.
सॅन फ्रान्सिस्को : हे शहर अमेरिकेतील सायन्स सिटी म्हणून ओळखली जाते. इथे फिरायचा आणि राहण्याचा खर्च खूपच जास्त आहे. (महागाई आणि आर्थिक परिस्थितीनुसार या शहरांच्या क्रमवारीत बदल होऊ शकतो.)