याला म्हणतात शेअर! ₹17 च्या स्टॉकची कमाल, गुंतवणूकदारांना केलं करोडपती, 6 महिन्यात पैसा डबल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 06:29 PM2024-01-27T18:29:23+5:302024-01-27T18:33:21+5:30

...तेव्हापासून आतापर्यंत या शेअरच्या किंमतीत 19,400% ची वाढ झाली आहे.

शेअर बाजारात गेल्या काही वर्षांमध्ये ज्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. त्यांपैकी एक म्हणजे, वारी रेन्यूएबल टेक्नॉलॉजीज (Waaree Renewable Technologies).

या कंपनीच्या शेअरला गुरुवारी पुन्हा एकदा 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. महत्वाचे म्हणजे, काही वर्षांपूर्वी या शेअरची किंमत केवळ 17 रुपये एवढी होती.

195 पट फायदा - गेल्या 5 वर्षांत ज्या गुंतवणूकदारांनी हा स्टॉक होल्ड करून ठेवला असेल, त्यांना 195 पट फायदा झाला असेल. 1 लाख रुपयांची गुंतवणूक करून होल्ड करणाऱ्या गुंतवणूकदारांचा फंड आता 1.95 कोटी रुपेय झाला आहे. गुरुवारी कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागल्यानंतर, 3317.15 रुपयांवर पोहोचली होती.

6 महिन्यांत पैसा डबल - गेल्या एका महिन्याच्या कालावधीत या शेअरमध्ये 80 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. तसेच, 6 महिन्यांचा विचार करता, सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला आहे. या कालावधीत मल्टीबॅगर स्टॉकच्या किंमतीत 125 टक्क्यांची वृद्धी झाली आहे.

19,400% चा परतावा - गेल्या एक वर्षापूर्वी, Waaree Renewable Technologies चा शेअर 495.50 रुपयांवर होता. तो आता 3317 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात या कालावधीत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 550 टक्क्यांची तेजी आली आहे.

गेल्या 5 वर्षांपूर्वी कंपनीचा शेअर 17 रुपयांवर होता. अर्थात तेव्हापासून आतापर्यंत या शेअरच्या किंमतीत 19,400% ची वाढ झाली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)